Sex Tips: सेक्स दरम्यान चांगला अनुभव घेण्यासाठी गोळ्या घेण्यापेक्षा बेडवर या 'Thrilling' गोष्टी करुन तुमच्या पार्टनरला द्या परमोच्च सुखाचा आनंद
Sex (Photo Credits: Instagram)

आपल्या जोडीदारासोबत आपली सेक्स लाईफ (Sex Life) खूप छान आणि इंटरेस्टिंग राहावी यासाठी अनेक कपलला सेक्स दरम्यान वेगवेगळे अनुभव घ्यायला फार आवडतात. आपल्या जोडीदाराला सेक्सचा उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी ते अनेकदा वायग्रा किंवा अन्य औषधांचे सेवनही करतात. पण तुम्हाला माहित आहे का अशी औषधे घेणे हे शरीरासाठी घातक आहेत. या औषधाचे सेवन करणे सेक्ससाठी जितके फायद्याचे आहे तितके शरीरास त्रासदायक देखील आहे आणि मुळात अशा अनैसर्गिक गोष्टींपासून मिळणारा आनंद हा काही क्षणापुरता असतो. त्याऐवजी बेडवर आपल्या पार्टनर सोबत सेक्सचे वेगवेगळे प्रकार ट्राय करणे जास्त फायद्याचे आहे. याने न केवळ तुम्हाला सेक्सचा आनंद घेता येईल तर तुमचे तुमच्या पार्टनरशी तुमचे नाते आणखी घट्ट होण्यास मदत होईल.

मात्र हे सर्व करताना त्यात थोडा रोमँटिकपणा असावा. अन्यथा तो आपल्या जोडीदारास केवळ एक फँटसी वाटेल. त्यामुळे जर तुम्हाला सेक्ससाठी औषधे घेण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्हाला या गोष्टी ट्राय करायला काही हरकत नाही.

1. जोडीदाराचा मूड बनवा

आपल्या जोडीदाराला सेक्सपूर्वी उत्तेजित करणे जास्त गरजेचे आहे. कारण प्रत्येक वेळी तुमचा पार्टनर सेक्ससाठी तयारच असेल असे नाही. त्यासाठी बेडवर जाण्यासाठी छान हॉट आणि तुमच्या पार्टनरला उत्तेजित करतील असे कपडे परिधान करा.

2. काही मादक गोष्टी करा

तुमच्या पार्टनरचा मूड बनविण्यासाठी पार्टनरसमोर काही सिडक्टिव गोष्टी करा. त्यात लाजणं, आपली इच्छा व्यक्त करणे, आपल्या डोळ्यांनी, ओठांनी पार्टनरला काही हिंट द्या. ज्याने त्याचीही सेक्स ची भावना जागेल.

3. हस्तमैथुन करा

हस्तमैथुनमुळे न केवळ आरोग्य चांगले राहते तर तुमची सेक्स लाईफही इंटरेस्टिंग बनते. त्यामुळे सेक्स तज्ज्ञही हस्तमैथुन करण्याचा सल्ला देतात. Sex Tips: सेक्स पूर्वी Masturbate केल्याने बेडवर जास्त वेळ टिकून राहण्यात होते मदत? जाणून घ्या उत्तर

4. वाइल्ड होणे जरुरीचे

जर तुम्ही सेक्ससाठी बेडवर जाण्यासाठी लाजत असाल तर तुम्ही तुम्ही सेक्सचा जास्त आनंद घेऊ शकणार नाही. त्यामुळे सेक्सदरम्यान थोड्या रोमांचित, वाइल्ड गोष्टी करण्यास हरकत नाही. त्यात लव बाइट, कानाचा चावा घेणे, चुंबन घेणे यांसारख्या गोष्टींनी सुरुवात करण्यास हरकत नाही.

5. सेक्स टॉय चा वापर

काही लोक सेक्स दरम्यान सेक्स टॉय चा वापर करतात. तुमच्या पार्टनरचा बेडवर जास्त काळ मूड टिकून राहण्यासाठी तुम्ही या सेक्स टॉय वापरु शकता.

या गोष्टींसोबत बदाम, टरबूज, स्ट्रॉबेरी, डार्क चॉकलेट सारखे सेक्स बूस्टर गोष्टींचेही तुम्ही तुमच्या रोजच्या डाएटमध्ये समावेश करु शकतात. ज्यामुळे सेक्स लाईफ खूप Thrilling आणि Interesting बनेल.

(टीप: हा लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे  यास सल्ला समजू नये)