Sex Life Queries: सेक्स करताना भीती वाटतेय? कदाचित तुम्हाला असु शकतात 'हे' Sexual Phobia, जाणुन घ्या त्याचे प्रकार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

Sex Life Tips: भीती! का, कधी, कशी,कसली वाटेल हे कोणालाही सांंगता येत नाही, बर्‍याचदा तर आपल्याला अमुक एक गोष्टीची भीती वाटतेय याची जाणीवही पहिले होत नाही मात्र सतत मनाला कसलीतरी चुणचुण लागुन राहते, हे प्रमाण वाढत गेलं तर कधी त्या छोट्याश्या भीतीचं फोबिया मध्ये रुपांंतर होतंं कळतही नाही. तुम्हाला माहितेय का हीच भीती तुमच्या सेक्स लाईफ वर सुद्धा अत्यंत वाईट परिणाम करु शकते. हे काही मनाचे खेळ नसुन वैद्यकीय भाषेत यांंना सेक्श्युअल फोबियाज म्हणुन ओळखले जाते. यातील काही फोबिया हे वाईट अनुभवांवरुन तर काही वेळा जन्मापासुनच असणार्‍या समजुती मधुन निर्माण झालेले असु शकतात. एखाद्या व्यक्तीच्या कौटुंबिक इतिहासाचा तसेच मित्र परिवाराचा सुद्धा यावर प्रभाव असु शकतो. तुमच्या पार्टनरला किंंवा स्वतः तुम्हालाही असा काही त्रास होतोय का हे तपासुन पाहा त्यासाठी या सेक्श्युअल फोबिया चे वेगवेगळे प्रकार जाणुन घेउयात..

Erotophobia

एरोटोफोबिया म्हणजे सेक्सशी संबंधित कोणत्याही गोष्टीची भीती. जोडीदाराबद्दल, सेक्स बद्दल बोलणंं किंंवा डर्टी टॉक,प्रायव्हेट पार्ट चा उल्लेख केल्याने सुद्धा ही भीती वाटु शकते. ही सगळ्यात टॉप ची स्थिती आहे.

Genophobia

जिनोफोबिया म्हणजेच या व्यक्तींंना विशेषतः पेनिट्रेशनची भीती वाटते म्हणजेच कदाचित त्यांना सर्वसाधारणपणे सेक्सबद्दल बोलणे आवडेल, किस केलेलं, मिठी मारलेलं किंंवा अगदी फोरप्ले पर्यंत सुद्धा ही मंंडळी नॉर्मल असतात मात्र प्रत्यक्ष सेक्स ची वेळ येताच त्यांंना भीती वाटू शकते. Oral Sex: महिला ओरल सेक्स म्हणजेच ब्लोजॉब देण्यासाठी का करतात टाळाटाळ? जाणुन घ्या यामागची कारणे

Tocophobia

ही भीती सेक्स पेक्षा सुद्धा परिणामांंची आहे. या मंंडळींंना विशेषतः महिलांंना जेव्हा गरोदर राहण्याची भीती वाटत असते त्या स्थितीला टोकोफोबिया म्हणतात. या मंंडळींंच्या डोक्यात हाच विचार चालु असल्याने ते सेक्स पुर्णतः एन्जॉय करत नाहीत अगदी जास्त गंभीर परिस्थितीत या लोकांंना फक्त बाळाचा उल्लेख करणं सुद्धा भीतीचं कारण ठरतं.

Oneirogmophobia

ओनिरोग्मोफोबिया म्हणजेच स्वप्नदोष यामध्ये पुरुष किंंवा महिलेला स्वप्नात दिसणार्‍या सेक्श्युअल गोष्टींंमुळे मुळ आयुष्यात सेक्स करण्याची भीती वाटते यावर कोणाचेच नियंत्रण नसते.

Sex न करण्याने सुद्धा शरीरावर होऊ शकतात दुष्परिणाम; रक्तदाब ते मानसिक तणाव जाणून घ्या सेक्सची कमतरता कशी ठरते घातक

Menophobia

हा फोबिया म्हणजेच मासिक पाळीची भीती आहे, महिलांंना वेळेवर न येणार्‍या पाळीमुळे किंंवा सेक्स करताना पीरिएडस येतील अशा भीतीने सेक्स करण्याची भीती वाटते, पुरुषांंना सुद्धा पाळीच्या रक्ताची भीती वाटुन त्यांंनाही हा फोबिया जाणवु शकतो. ही भीती महिन्यातील काही दिवसांंपुरती मर्यादित असते त्यामुळे अन्य वेळेस अशा मंडळींंना फार त्रास होत नाही.

एक लक्षात घ्या काही आजार नाही पण तितकाच गंंभीर मुद्दा आहे, यावर उपाय करण्यासाठी आधी पार्टनर्सनी एकमेकांंशी संवाद साधणे आवश्यक आहे, याशिवाय सेक्स तज्ञ, रिलेशनशीप सल्लागार यांंचीही मदत घेऊ शकता. यात घाबरण्याची गरज नाही हे नक्की ध्यानी राहुद्या.