Relationship Tips: तुमचा पार्टनर तुमच्यासोबत Emotional Cheating करतोय? 'या' संकेतांमधून तुम्हाला कळू शकेल
रिलेशनशीप Photo Credits : pexels.com

काहीजण रिलेशनशिप्स मध्ये असून ही ते स्वत:ला एकटे असल्यासारखे समजतात. एकत्रितपणे गरजेपेक्षा अधिक वेळ एकमेकांसोबत घालवल्यानंतर काही जणांना पार्टनरच्या प्रति वाटणारी आपुलकी कमी होत असल्याचे वाटू लागते. असे का होते माहिती आहे का? जरी आपण इमानदारीने नाते जपण्याचा प्रयत्न करतो खरे पण समोरचा व्यक्ती त्याच पद्धतीने वागेल याची अपेक्षा आपण करु शकत नाही. काही वेळेस समोरच्या व्यक्तीकडून आपल्या ज्या अपेक्षा असतात त्या सुद्धा कधी पूर्ण न झाल्यास आपल्याला त्याचे दु:ख होते. मात्र जर तुमचा पार्टनर तुम्हाला फसवत आहेच पण त्याचसोबत इमोशनल चीटिंग ही करत असल्यास त्यावर तुम्हाला तोडगा काढावा लागणार आहे.

आपल्या पार्टनरला कोणत्या गोष्टी केल्या की आवडतात किंवा नावडतात त्याकडे आपले लक्ष असले पाहिजे. जर तुम्ही एखादी गोष्ट पार्टनरच्या विरोधात केली तर त्याला राग येऊन तुमच्यात भांडण होण्याची शक्यता असते. परंतु जर तुमचा पार्टनर तुम्हाला इमोशनल चीट करत असल्यास तर 'या' संकेतांच्या माध्यमातून त्याचा खोटेपणा समोर आणू शकता.(Sex Tips: सेक्स दरम्यान पुरुषांना महिलांकडून अपेक्षित असणा-या 'या' 5 गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष)

>>एखाद्या व्यक्तीवरुन तुमच्यासोबत वाद घालणे

कोणतेही नाते जपून ठेवायचे असल्यास त्यात एकमेकांबद्दल आदर आणि विश्वास असला पाहिजे. मात्र जर तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीवरुन भांडण झाले आणि त्याचा आरोप पार्टनर तुमच्यावर टाकत असल्यास तर हे निश्चित की त्याला तुमची परवाह नाही. नात्यात असून सुद्धा तो तिसऱ्या व्यक्तीला अधिक महत्व देऊ पाहत आहे हे समजून जा.

>>तुमच्या नाराजीकडे दुलर्क्ष करणे

नात्यात तिसऱ्या व्यक्तीमुळे पार्टनरने तुमच्यावर राग व्यक्त केला. पण त्याच्यावर त्याचा कोणताच परिणाम होत नसेल आणि तो स्वत:ला शांत करण्याऐवजी तुमच्यावरच आरोप लावत असेल. तर समजून घ्या की पार्टनर तुमच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत असून तिसऱ्या व्यक्तीबद्दल अधिक विचार करत आहे. ऐवढेच नाही तिसऱ्या व्यक्तीबद्दल त्याचे नाते सुरु तर नसेल ना असा प्रश्न सुद्धा तुमच्या मनात उद्भवू शकतो.

>>स्वत:बद्दल तिरस्काराची भावना निर्माण होणे

जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुमचा पार्टनर तुमच्यापेक्षा अधिक महत्व तिसऱ्या व्यक्तीला देत आहे. अशा वेळी आपण त्याबद्दल अधिक विचार करत राहतो. हळूहळू आपल्याला आपलाच तिस्कार सुद्धा वाटू लागतो. काही वेळेस असे ही वाटते की, आपण पार्टनरसाठी योग्य व्यक्ती नाही आहोत.

>>तुमचे नाते संपुष्टात येणार असल्याच्या स्थितीत असेल

नात्यात वारंवार भांडण होत राहिल्याने तुम्हाला असे ही वाटेल की आधी सारखे नाते राहिलेले नाही. ऐवढेच नाही तर पार्टनर तुमच्यापेक्षा कोणत्यातरी दुसऱ्याच व्यक्तीला अधिक महत्व देऊ लागला आहे. तर या संकेताच्या माध्यमातून समजून जा तुमचा पार्टनर तुमच्यासोबत इमोशनल चिटिंग करत आहे.(Love & Relationships: पार्टनरचा बेस्ट फ्रेंड ठरतोय डोक्याला ताप, चिडचिड करण्याऐवजी करुन पाहा 'हे' उपाय)

तर वरील काही गोष्टी लक्षात घेता तुम्ही पार्टनरल बद्दल योग्य तो निर्णय घेण्यास सक्षम रहा. तसेच नात्यात स्वत:ला कधीच कमी लेखू नका. जेणेकरुन तुम्हाला त्याचा अधिक त्रास होऊन त्याचा आरोग्यवर ही परिणाम होईल. प्रत्येकाला आयुष्य एकदाच मिळते असे म्हणतात त्यामुळे सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासह त्याची मजा सुद्धा घ्या.