
जेव्हा जेव्हा सेक्सचा (Sex) विषय येतो तेव्हा तेव्हा महिला पार्टनरला उत्तेजित करण्यासाठी वा त्या सेक्सदरम्यान दुखावल्या जाणार नाही यासाठी पुरुषांनी कोणत्या गोष्टी कराव्यात वा करु नये याबाबत अनेकदा पुरुषांना सांगण्यात येते. महिला या थोड्या संवेदनशील असतात त्यामुळे सेक्सदरम्या त्यांना चुकीच्या पद्धतीने हाताळले तर त्या दुखावतात. मात्र या सर्वांचा विचार करताना पुरुषांना सेक्सदरम्यान काय हवे असते याकडे थोडा कानाडोळाच केला जातो. सेक्स हा पुरुषाची जितका आवडीचा तितकाच खूप खास विषय असतो. त्यामुळे आपल्या महिला जोडीदारानेही आपल्याला सेक्स दरम्यान तितक्याच चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्यावा अशी त्यांची अपेक्षा असते.
मात्र याबाबतीत महिलांकडून दुर्लक्ष होते. त्यामुळे सेक्स दरम्यान अनेकदा पुरुषांची निराशा होती. ज्यामुळे ते Orgasm पर्यंत पोहोचत नाही. यासाठी महिलांनी सेक्स दरम्यान काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. Sex Tips: नेहमीपेक्षा वेगळ्या 'या' सेक्स पोजिशन तुम्हाला ठाउक आहेत का? Orgasm मिळवण्यासाठी ठरतात बेस्ट
1. सेक्स बद्दल त्यांच्या फँटसी जाणून घेण्याचा प्रयत्न करा
जसं महिलांना सेक्सबाबत काही फँटसी असतात त्याप्रमाणे पुरुषांच्या मनातही अशा काही गोष्टी असतात. त्यामुळे तुम्ही सेक्सदरम्यान त्यांच्याशी बोलून त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
2. त्यांच्या सेक्स Stamina ची स्तुती करा
जसं महिलांना सेक्सदरम्यान त्यांच्या सौदर्याची स्तुती केलेलं आवडतं तसच पुरुषांनाही त्याच्या सेक्स परफॉर्मन्स बद्दल स्तुती केलेली आवडते. ज्यामुळे त्यांचा सेक्सदरम्यान उत्साह वाढतो. ज्याचा फायदा तुम्हाला Orgasm पर्यंत नेण्यासाठी होतो.
3. पुरुषांच्या संवेदनशील जागांवर त्यांना स्पर्श करा
जशा महिलांच्या शरीराचे काही भाग जसे गळा, स्तन, मांड्या हे संवेदनशील जागा आहेत तसेच पुरुषांचेही कान, गळा, छाती, शीस्न या संवेदनशील जागा आहेत. त्यामुळे त्यांना स्पर्श केल्यास त्यांना छान वाटते आणि ते उत्तेजित होतात.
4. पुरुषांसोबत सेक्सी गोष्टींवर बोलणे
अनेकदा महिलांना सेक्सी गोष्टींवर बोलणे आवडत नाही. मात्र पुरुषांना या गोष्टी फार आवडतात. त्यामुळे आपण पुढाकार घेऊन या विषयावर त्यांच्याशी बोलतात तर त्यांना वाटेल की आपल्याएवढी तुम्हालाही सेक्स मध्ये रस आहे.
5. नजरेला नजर द्या
सेक्स दरम्यान महिला अनेकदा लाजतात आणि पुरुषांपासून नजर लपवतात. मात्र काही वेळा सेक्सदरम्यान पुरुषांच्या नजरेला नजर देणेही त्यांना आवडते. त्यामुळे या गोष्टीकडेही लक्ष द्या.
एक गोष्ट लक्षात ठेवा सेक्सदरम्यान जरूरी नाही की नेहमी पुरुषांनीच पुढाकार घ्यावा. महिलांनीही कधी कधी सेक्ससाठी पुढाकार घेतल्यास पुरुषांना देखील या गोष्टीत आनंद मिळतो.