Sex Tips: अनेकदा महिलांना सेक्स (Sex) करण्याची इच्छा होऊ शकते हे मान्यच केले जात नाही आणि त्यातही मासिक पाळीच्या काळात तर सेक्स (Period Sex) म्हणजे आता अनेकांचे डोळे नुसतं वाचूनच विस्फारले असतील. पाळीच्या दरम्यान अनेक महिलांना नेहमीपेक्षा अधिक उत्तेजित फील होत असते, सोप्प्या शब्दात सांगायचं झालं तर शरीरातील हार्मोन्स मध्ये होणाऱ्या हालचालीमुळे या काळात सेक्स ड्राइव्ह वाढत असते. आपल्या कडे जिथे पाळी आलेल्या महिलेला अजूनही घरभर फिरण्याची परवानगी नाही तिथे ही बाब समजून घेणे कठीणच आहे. पण जर का तुम्ही एका पुढारलेल्या नात्यात असाल तर तुम्हाला ही गोष्ट तुमच्या पार्टनरशी बोलून घेणे आवश्यक आहे. सेक्स एक्सपर्ट (Sex Expert) नादिया बोकोडी (Nadia Bokody) यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितल्यानुसार जर का तुमच्या पार्टनरला तुमचे पिरीएड्स चालू असताना तुमच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे आवडत नसेल तर त्या नात्यात काहीतरी गडबड आहे, किंबहुना निदान एक संवाद तरी आवश्यक आहे.
नादिया यांनी सांगितले की, गूगल वर होणाऱ्या सर्चनुसार जवळपास 12 लाख महिला या ही समस्या रोज सर्च करतात, ज्यानुसार त्यांची मासिक पाळी आली असताना त्यांची सेक्स करण्याची इच्छा असूनही त्यांचे पार्टनर तयार होत नाहीत म्हणून मन मारून राहावे लागते. अनेक पार्टनर्स साठी पिरेड्स हे टर्न ऑफ असल्याचे सुद्धा या सर्च मधून समोर येते.या सगळ्यामागे कारण असे असू शकते की जी नैसर्गिक प्रक्रिया समजण्यात तुमचा पार्टनर कमी पडत आहे, त्यामुळे जर का तुम्हाला ही समस्या दूर कार्याची असेल तर तुम्ही त्याच्याशी बोलणे आवश्यक आहे. तरीही जर का तुमचा पार्टनर तयार होत नसेल तर जबरदस्ती करू नकाच पण तुमच्या नात्याविषयी एकमेकांसोबतच्या कम्फर्ट विषयी थोडा विचार करा. अगदीच तुम्ही नातं संपवण्याचा विचार केलात तरी तो स्वार्थी आहे असे अजिबात म्हणता येणार नाही.
आता यातील महत्वाची बाब म्हणजे पिरेड सेक्स हा सुरक्षित आहे का? तर हा मुद्दा मुळातच व्यक्तिसापेक्ष आहे. म्हणजेच काही महिलांना या याकाळात सेक्स केल्यामुळे वेदना कमी होतात असाही अनुभव आला आहे तर काहींच्या बाबत हे उलट आहे. मात्र सर्वसाधारणपणे पाहायला गेल्यास पिरेड्स मध्ये सेक्स करण्याचे फायदे अधिक आहेत.