लग्नसोहळा नेहमीच आठवणीत रहावा यासाठी लोक भरघोस तयारी करतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची खरेदी केली जाते. एखाद्या जंगी ठिकाणी लग्न केल्यानंतर पाहुण्यांसह अन्य जणांना 3-4 वेळा लग्नाचे रिसेप्शन द्यावे लागते. त्यामुळे लग्नाचे वेगळ्या पद्धतीने रिसेप्शन देणे हा सध्या ट्रेन्ड बनला आहे. मात्र काही वेळेस लग्नासाठी खुप खर्च केला तरीही लोकांकडून टीका केली जाते. काहीजण म्हणतात की फक्त दाखवण्यासाठी मोठ्या थाटात लग्न केले जात आहे.
मात्र तुम्हाला माहिती आहे का, लग्न हे एक दोन व्यक्तींमधील पवित्र नात्याची सुरुवात असून तो कोणाला दाखवण्यासाठी केले जात नाही. परंतु काही जणांना त्यांच्या ऐपतीनुसार लग्न करणे योग्य वाटते. पण काहीजण जरी साध्या पद्धतीने लग्न केल्यास त्यावरही प्रश्न उपस्थितीत करतात. यामुळे काही वेळेस वैवाहिक आयुष्यात लग्न केल्यानंतर तणाव अधिकाधिक वाढत जातो. या तणावाचे कालांतराने घटस्फोटात रुपांतर होऊन नाते दुभंगल्याचे दिसून येते.
नोवी मनी यांनी केलेल्या एका सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, गेल्या 10 वर्षात लग्न केलेल्यांपैकी 1 हजार व्यक्तींबाबत सर्वे करण्यात आला आहे. त्यानुसार त्यांनी लग्नासाठी किती खर्च आणि स्वत:साठी किती खर्च केला याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तसेट लग्नानंतर तुमचे आयुष्य कसे सुरु आहे याची सुद्धा विचारणा करण्यात आली. तर सर्वेनुसार लाखो करोडो रुपये खर्च करुन ही बहुतांश लोक सुखी आहेत. पण ज्यांनी लग्नासाठी 70 हजार रुपये खर्च केला आहे ते सध्या आयुष्यात सुरु असलेल्या काही कारणांमुळे नाखुश आहेत.(जोडीदारासह नातं टिकवायचे असेल तर चुकूनही दुर्लक्षित करु नका या '5' गोष्टी)
दुसऱ्या बाजूला घटस्फोटित आणि दुसरे लग्न करणाऱ्या व्यक्तींचे असे म्हणणे आहे की, त्यांनी त्यांच्या पहिल्या लग्नासाठी 70 हजार रुपयांपेक्षा कमी पैसे खर्च केले होते. दरम्यान लग्न सोहळ्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. मात्र गरजेपेक्षा जास्त पैसे लग्नात खर्च केलेल्या व्यक्तींमध्ये तणाव सुद्धा दिसून आला आहे. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करण्यात आलेला विवाहसोहळ्यामुळे कर्जाचा बोझा अधिक वाढल्याची स्थिती सुद्धा काही जणांची झाली आहे.