Losing Your Virginity: तुम्ही तुमची वर्जिनिटी गमावणार आहात? पहिल्यांदा सेक्स करताना 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash)

Losing Your Virginity: प्रत्येक कपल्सच्या आयुष्यात असा एक क्षण येतो ज्या वेळी ते पहिल्यांदाच एकमेकांसोबत अगदीच जवळीक येऊन शारिरीक संबंध ठेवतात. आयुष्यात पहिल्यांच केलेल सेक्स नेहमीच लक्षात राहणारे आणि खास असल्याचे म्हटले जाते. पहिल्या वेळेस सेक्स करण्याबाबतचा विचार करणे, एखादी त्याबाबत फँटेसी किंवा चित्रपटातील एखादा रोमँटिक क्षण पाहून ते प्रत्यक्षात करण्याबाबत मुली फार उत्सुक असतात. खर पहायला गेल्यास मुलींना आपली वर्जिनिटी पहिल्यांदाच गमावण्याच अनुभव एक वेगळाच असतो. खासकरुन पहिल्यांदाच सेक्स करताना दुखणे, ऑर्गेज्म आणि त्याबाबतच्या काही गोष्टींबाबत मुली अधिक विचार करतात. या पहिल्या सेक्सचा अनुभव वेगळाच असून यासाठी खास तयारी करणे सुद्धा महत्वाचे आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच तुमच्या पार्टनर सोबत सेक्स करण्याचा विचार करत असल्यास 'या' काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा.

-अधिक अपेक्षा बाळगू नका

पहिल्यांदाच तुम्ही पार्टनर सोबत सेक्स करत असल्यास त्यावेळी समोरच्या व्यक्तीकडून अधिक अपेक्षा बाळगू नका. तसेच पहिल्याच वेळेस सेक्स केल्यानंतर 100 टक्के तुम्ही संतुष्ट व्हाल असे नाही. खरंतर पहिल्याच वेळचा सेक्सचा अनुभव तुमच्यासाठी एक वेगळा जरी असल्यास पार्टनरला त्याचा त्रास होणार नाही ना याचा सुद्धा विचार करा.

-प्रोटेक्शनचा वापर करा

जर तुम्ही वर्जिनिटी गमावणार असल्यास तर पहिल्यांदाच सेक्स करताना सुरक्षितेतचा विचार करा. सेफ सेक्स करण्यासाठी पार्टनरने कंडोमचा वापर करायला हवा.(Sex during Coronavirus: सेक्स करायचाय पण कोरोना आढवा येतो...? हे पर्याय वापरता येतील का?)

-स्वत:ला प्रश्न विचारा

पहिल्यांदा तुम्ही सेक्स करत असल्यास मनात भीती असतेच. त्यामुळे त्यावेळी तुम्हाला तुम्ही सेक्स करण्यासाठी तयार आहात का? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न उद्भवू शकतात. पण असे प्रश्न उद्भवणे सहाजिकच असून तुम्ही खरच सेक्स करण्यासाठी तयार आहात का प्रश्न स्वत:लाच विचारा.

-तुमच्यावर प्रभाव पडू शकतो

तुम्ही हे जरुर लक्षात ठेवा की, एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही ज्यावेळी शारिरीक संबंध ठेवण्यास जाता त्यावेळी त्याचा तुमच्यावर भावनात्मक प्रभाव पडू शकतो. आम्ही असे म्हणत नाही आहोत की, तुम्ही पहिल्यांदाच सेक्स करतायत तर पार्टनर सोबत लग्न करा. पण तुम्ही पार्टनरसोबत सेक्स केल्यानंतर तुम्हाला त्याच्या बाबत आपुलकी वाटण्यास सुरुवात होईल.

-अनुभवाचा आनंद घ्या

शेवटी पहिल्यांच सेक्स केल्यानंतर त्याच्या अनुभवाचा आनंद घ्यायला विसरु नका, पहिल्यांदाच सेक्स करणे हे एखाद्या साहसिक कामासारखेच आहे. कारण तुम्ही पार्टनरसोबत शारिरीक संबंध ठेवल्यानंतर तुम्हाला आणखी नव्या गोष्टी सुद्धा माहिती पडतात. पहिल्यांदच सेक्स केल्यानंतर तुमच्या पार्टनरला कशा पद्धतीने ते करण्यास आवडते याबाबत सुद्धा नक्की जाणून घ्या.