भारतात सेक्सला टॅबूच्या नजरेने पाहिले जाते. खासकरुन लग्न झाल्यावर महिलांकडून अशी अपेक्षा केली जाते की, त्या नवऱ्याशिवाय अन्य कोणत्याही अन्य पुरुषासोबत शारिरीक संबंध ठेवू शकत नाहीत. विवाहित महिलांचे नाते हे चांगल्या दृष्टीकोनातून पाहिले जाते तर एक्स्ट्रा मॅरिटियल अफेरला विरोध केला जातो. परंतु सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे विवाहिक जीवनातील भांडण अन्य गोष्टी पाहता एक्स्ट्रा मरिटल अफेअर करण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. तसेच सोशल मीडियावर विविध अॅपच्या माध्यमातून एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठेवणे सोपे झाले आहे.एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅप ग्लीडन यांनी एक रिसर्च केला आहे. त्यानुसार 53 टक्के भारतीय महिला यांनी त्यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचे म्हटले आहे. तर लग्नानंतर महिलांसोबत संबंध ठेवणाऱ्या पुरुषांची संख्या 43 टक्के आहे.
ग्लीडनच्या मार्केटिंग डायरेक्टर सोलेन पॅलेट यांच्या मते, रोमान्स आणि फसवणूक या प्रकरणी भारतीय महिला खुल्या विचारांच्या असतात. ग्लीडन यांना हा सर्वे ऑनलाईन पद्धतीने केला आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, पुणे, अहमदाबाद सारख्य बड्या शहारातील लोकांनी सहभाग घेतला होता. रिसर्चमध्ये असा खुलासा करण्यात आला आहे की, पुरुषांपेक्षा महिलांचीच अधिक संख्या असून ज्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करण्याकडे वळल्या आहेत. (Sex Tips: सेक्स दरम्यान महिलांना आवडतात या '5' हॉट पोजिशन्स ज्या पुरुष जोडीदाराला देतील रोमांचकारी अनुभव)
अभ्यासानुसार, नवऱ्याशिवाय अन्य पुरुषांसोबत नेहमी शारिरीक संबंध ठेवणाऱ्या महिलांची संख्या 40 टक्के तर 26 टक्के पुरुष मंडळी त्यांच्या बायकोशिवाय अन्य महिलांसोबत नियमित रुपात सेक्स करतात. रिसर्चमध्ये भारतात जवळजवळ 50 टक्के विविहित लोकांनी ते अन्य लोकांसोबत शारिरीक संबंध ठेवत असल्याचे कबुल केले आहे. तसेच 47 टक्के लोकांनी असे मानले की ते त्यांच्या पार्टनरशिवाय अन्य व्यक्तीसोबत कॅज्युअल रिलेशनशिप ठेवतात. तसेच 46 टक्के लोकांनी वन नाइट स्टॅंडचा स्विकार केला आहे.