रिलेशनशिप धोक्यात आली आहे? Breakup होणार असं वाटतंय? अशा वेळी आपल्यापैकी अनेक जण लव गुरुचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करतात. हे लव गुरुही आपापल्या बुद्धीप्रमाणे प्रेमात अपयशी ठरण्याची शक्यता असलेल्या किंवा ठरलेल्या मंडळींना सल्ले देतात. पण, बिहारमधील एक लव गुरु (Love Guru) मात्र कपल्सना एक हटके सल्ला देतात. गर्लफ्रेंड (Girlfriend) सोबत ब्रेकअप (Breakup) टाळण्यासाठी या लवगुरूने दिलेल्या सल्ल्याची सध्या भलतीच चर्चा आहे. वेद प्रकाश असे या लव गुरुंचे नाव आहे. अर्थात वेद प्रकाश हे वास्तवात लव गुरु नाहीत. पण, त्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांना लव गुरु म्हटले जात आहे. काय आहे तो सल्ला? घ्या जाणून...
कोण आहेत वेद प्रकाश?
दिल्ली एनसीआर आणि मुंबई शहरामध्ये गेली 5 वर्षे पर्यावरणविषयक माहिती आणि उपक्रम राबविणारे वेद प्रकाश हे पेशाने हॉटेल इंडस्ट्रीशी जोडलेले आहेत. ते मुळचे बिहारचे असून, त्यांना पर्यावरण प्रेमी म्हणून ओळखले जाते. दिल्ली येथील चाणक्यपुरी येथील हॉटेल लिला मध्ये ते असिस्टेंट मॅनेजर (हाउसकीपिंग) आहेत. गेल्या वर्षी त्यांनी स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण ही संकल्पना राबवत मोहिम आखली होती. वेदप्रकाश सांगतात की, निसर्गाने आम्हाला बरेच काही दिले आहे. त्यामुळे मी पर्यावरणविषयक काम करण्याचे ठरवले.
प्लेकार्ड निसर्गाशी जोडण्यासठी
आता त्यांनी लोकांना पर्यावरण संवर्धनाचा विचार पटवून देण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. वेद प्रकाश यांनी दिल्ली-एनसीआरमध्ये लोकांना सुखा-समाधानाचे आयुष्य जगता यावे यासाठी पर्यावरणाशी स्वत: ला जोडून घेण्यास सांगतात. यासाठी त्यांनी प्लेकार्ड नावाची एक मोहीमही सुरु केली आहे. जागरण डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार नागरिकांना निसर्गाशी जोडण्यासाठी आणि पर्यावरण रक्षण करण्यासाठीच वेद प्रकाश यांनी ही शक्कल लढवली आहे. (हेही वाचा, Break Up झाल्यावर चुकूनसुद्धा करु नका 'या' गोष्टी, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल)
काय आहे प्लेकार्ड मोहीम?
वेद प्रकाश प्लेकार्ड मोहिमेअंतर्गत सांगतात की, तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड च्या नावाने एक झाड लावा. तुमचे ब्रेकअप होणार नाही. पण, गर्लफ्रेंडच का? असे विचारले असता वेद प्रकाश सांगतात की, आजकाल युवापिढी गर्लफ्रेंड या शब्दावरुन अपील मनावर घेतात. खरे तर प्रत्येक युवक आपल्या गर्लफ्रेंडचे ऐकतोच ऐकतो.