वाढते वय आणि बदलते लैंगिक संबंधातील जोडीदाल यांचा काही संबंध आहे का? असा प्रश्न जर तुम्हाला केव्हा पडला असेल तर तो गैर नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे 'होय' असा संबंध आहे. असे आम्ही नव्हे तर एका अभ्यासातील अहवालच सांगतो आहे. ईस्ट एंग्लिया विद्यापीठातील (University of East Anglia-UAE) अभ्यासकांनी केलेल्या एका सर्व्हेक्षणातील अहवालानुसार लोक वाढत्या वयासोबत त्यांचे लैंगिक जोडीदारही बदलतात. त्यामुळे त्यात वाढ हते. किंग्स कॉलेज लंडन आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन यांच्या सहकार्याने युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लिया (UEA) च्या अभ्यासानुसार, 70 वर्षांवरील अनेक समलिंगी आणि हेट्रोसेक्शुअल (Bisexual) पुरुष अनेक भागीदारांसोबत लैंगिक जीवन जगतात, तर वयाच्या 50 नंतर स्त्रिया लैंगिकदृष्ट्या कमी सक्रिय होतात.
अभ्यासकांच्या गटाने अभ्यासापूर्वी वेगवेगळ्या वयोगटाची निवड केली होती. ज्यामध्ये त्यांच्य लैंगिक जोडीदार, संकल्पना आणि इतर बाबींचा समावेश होता. UEA च्या नॉर्विच मेडिकल स्कूलमधील डॉ जुली ब्रेनर्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण 40 ते 65 वयोगटातील लोकांनी लैंगिक सक्रीयता कमी केली आहे. तसेच, त्यांनी आपले जोडीदारही बदलले आहेत. हा अभ्यास 5,164 ब्रिटीश नागरिकांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे, ज्यापैकी 3,297 सामान्य लोकसंख्येमधून काढले गेले होते आणि त्यापैकी 1,036 फेसबुक आणि Instagram द्वारे निवडण्यात आले होते. LGBTQ डेटिंग अॅप Grindr वरील जाहिरातींना अतिरिक्त 831 लोकांनी प्रतिसाद दिला.
संशोधकांनी गेल्या तीन आठवड्यांतील लैंगिक जोडीदाराची संख्या आणि प्रतिसाद देणारे वय यांच्यातील संबंधांचे निरिक्षण केले. त्यासाठी एखाद्या व्यक्तीचे वय त्यांच्या अलीकडील जोडीदाराच्या संख्येशी किती जोडलेले आहे हे सुद्धा सांख्यिकी मॉडेलच्या आधारे तपसाले. त्या अभ्यासानुसार मागील तीन आठवड्यांमध्ये बहुतेक लोकांमध्ये कोणत्याही वयात शून्य किंवा एक लैंगिक जोडीदार होता. गेल्या तीन आठवड्यांत 50 वर्षांचे होईपर्यंत सुमारे 65 टक्के स्त्रियांनी विषमलिंगी एक जोडीदार असल्याचे नोंदवले. त्यानंतर त्यांची भागीदारी कमी झाल्याचे त्यांनी नोंदवले.
दुसऱ्या बाजूला 70 वर्षांहून अधिक वयाच्या जवळपास 79 टक्के महिला, ज्यांना Heterosexual म्हणून ओळखल्या गेल्या. ज्यांना पाठिमागील तीन महिन्यांत कोणतेही पुरुष भागीदार नव्हते. अभ्यासात असे दिसून आले आहे की सुमारे 50 टक्के विषमलिंगी पुरुषांनी गेल्या तीन आठवड्यांत एक जोडीदार असल्याचे नोंदवले. परंतु वय वाढल्याने ते भागीदार नसल्याचे सांगण्याची शक्यता वाढत होती. त्याच तुलनेत 70 वर्षांहून अधिक वयाचे सुमारे 50 टक्के पुरुष जे Heterosexual होते किंवा गेल्या तीन महिन्यांत कोणत्याही स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवत होते, त्यांना अलीकडच्या तीन आठवड्यांत महिला जोडीदार मिळाला नाही.