Nilu Phule (Photo Credits: Wikipedia)

Nilu Phule Death Anniversary: 'बाई वाड्यावर या' म्हणत आपल्या रांगड्या आवाजाने तब्बल 40 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणारा पडद्यावरचा जबरदस्त खलनायक निळू फुले यांचा आज, चौदावा स्मृती दिन आहे. मराठी चित्रपट सृष्टीत जेव्हा पौराणिक व कौटुंबिक कथांचा काळ सुरु होता, तेव्हा फुले यांनी खलनायकी रूपात सिनेमाला तडका लावला. 'एक गाव बारा भानगडी' या सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले, आणि त्यानंतर मागे वळून न पाहता, 2009 पर्यंत त्यांनी मायबाप प्रेक्षकांची सेवा केली, 13 जुलै 2009 रोजी त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.

असं म्हणतात, एखाद्या नटाला टाळ्या, शिट्ट्या, मिळवून जेवढं कौतुक मिळालं नसेल तेवढे लोक पडद्यावरील या जादूगाराला शिव्या शाप द्यायचे, बायका तर अक्षरशः बोटं मोडायच्या, पण हीच निळू फुले यांच्या दमदार अभिनयाची पोचपावती होती. आज, निळू फुले यांच्या स्मृती दिनाच्या प्रित्यर्थ या रंगेल खलनायकाच्या पडद्यावरील व पडद्यामागील जीवनावर एक नजर टाकुयात..

रंगमंचाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारे नीलकंठ कृष्णाजी फुले उर्फ ​​निळू भाऊ फुले यांच्याबद्दल फारच कमी लोकं असतील ज्यांना त्यांची ओळख नसेल. सुरुवातीपासूनच ते एक दमदार अभिनेते होते. निळू फुले यांनी 1968 मध्ये 'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. मग, त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत जी ओळख मिळविली ती आजही कायम आहे.

त्यांनी पिंजरा, सामना, जैत रे जैत, दोन बाईका फजिती ऐका, वो 7 दिन, कुली अशा अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.  निळू फुले यांचं वय झाल्यानंतर चित्रपटांमध्ये ग्रे शेड अभिनेता बनले होते. यादरम्यान त्यांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. ज्या काळात कलाकार किंचाळणाऱ्या संवादांद्वारे पडद्यावर आपली भीतीचे वातावरण निर्माण करत होते, त्याच्या उलट निळू फुले गप्प राबन पडद्यावर थरार निर्माण करत होते, त्याच्या क्षणिक शांततेने प्रेक्षकांचे शरीर थरथर कापायला लागायचे.

वयाच्या 17 व्या वर्षी पुण्यातील सशस्त्र सैन्य वैद्यकीय महाविद्यालयात माळी म्हणून काम करणारे निळू फुले राष्ट्रीय सेवा दलाला त्याच्या ऐंशी रुपयांच्या मासिक पगारापैकी दहा रुपये दान द्यायचे. गोष्ट छोटी डोंगराऐवढी या चित्रपटात फुलेंनी उत्तम भूमिका साकारली होती. परंतु हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन महिन्यांनतर वयाच्या 71 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्याना एक मुलगी आहे जी ती सुद्दा एक उत्तम अभिनेत्री आहे. निळू फुले आज आपल्यात नाही. पण त्यांची मुलगी त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेत आहे. अनेक मालिकांमध्ये गार्गी फुले यांना पहायला मिळतं. निळू फुले यांच्या मुलीचे पुर्ण नाव गार्गी फुले थत्ते आहे. ‘तुला पाहते रे’ ही मालिकेत त्यांनी ईशाच्या आईची भुमिका साकारली होती.