राशी भविष्य (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

30  जुलै 2020 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष: धनलाभ होऊ शकेल. तुमची ठरवलेली कामं पूर्ण होतील. वडीलांकडून मदत मिळेल. घर-परिवारासोबत जास्त वेळ घालवाल.

शुभ उपाय- शंकराची पूजा करा.

शुभ दान- अन्नदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- केशरी

वृषभ: नोकरीत स्वत:च्या कामावर लक्ष दिलात तर बरे होईल. कामे तुम्ही आनंदाने स्वीकारलात तर दिवस चांगला राहील. काही न सुटणारे प्रश्न अचानक समोर येतील.

शुभ उपाय- केशर दुधाचा नैवेद्य दाखवा.

शुभ दान- गरजूंना आर्थिक मदत करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- गुलाबी

मिथुन: दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर तुमचे लक्ष असेल. सोबतच्या व्यक्तींची मदत मिळेल.

शुभ उपाय- गाईला चारा द्या.

शुभ दान- तांदूळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पांढरा

कर्क: दिवस चांगला आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. कामामध्ये सहकाऱ्यांची मदत होईल. कोणती चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत.

शुभ उपाय- दही खाऊन घराबाहेर पडा.

शुभ दान- गरीबांना अंथरुण दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- करडा

सिंह: कामकाजा संबंधीत नव्या कल्पना सुचतील. दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या.

शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.

शुभ दान- रक्तदान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- गुलाबी

कन्या: व्यवसायासाठी नव्या लोकांशी संपर्क होतील. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल.

शुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर पडा.

शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.

शुभ अंक- 3

शुभ रंग- क्रिम कलर

तुळ: उत्पन्न आणि होणाऱ्या खर्चावर विचार करा. यश नक्की मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

शुभ उपाय- घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा.

शुभ दान- कुत्र्याला जेवण द्या.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पिवळा

वृश्चिक: आरोग्य निरोगी राहील. मनावर नियंत्रण ठेवा. धनलाभ होईल. कुटुंबातील व्यक्तींमध्ये अनुकूल वातावरण राहील. प्रलंबित कामं पूर्ण होतील.

शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.

शुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- आकाशी

धनु: कठिण परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

शुभ उपाय- सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करा.

शुभ दान- गाईंना चारा द्या.

शुभ अंक- 6

शुभ रंग- जांभळा

मकर:  वायफळ खर्च करणं टाळा. इतरांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.

शुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळ खा.

शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पोपटी

कुंभ: मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. विवाह करण्यासाठी चांगला योग आहे. आरोग्य निरोगी राहील.

शुभ उपाय- सरस्वतीचे पूजन करा.

शुभ दान- अन्न दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- जांभळा

मीन: प्रलंबित कामं पूर्ण होतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामा-धंद्यात वाढ होईल.

शुभ उपाय- लक्ष्मीची पूजा करा.

शुभ दान- लाल झेंडा किंवा नारळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- निळ