आजचे राशीभविष्य, रविवार, 13 मार्च 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
राशी भविष्य- (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

13 मार्च 2022 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.

मेष: आजच्या दिवशी मेष राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करु नका. वैवाहिक जीवनात थोडे खचल्यासारखे वाटेल. पण संयमाने वागल्यास वाद होणार नाही.

शुभ उपाय- पक्षांना अन्नदान करा.

शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पांढरा

वृषभ: वृषभ राशीतील व्यक्तींनी खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे. देवाचे नामस्मरण करा दिवस उत्तम जाईल. तुमची प्रियकर व्यक्ती तुम्हाला फोन करुन सतावण्याची शक्यता आहे.

शुभ उपाय- सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करा.

शुभ दान- गाईंना चारा द्या.

शुभ अंक- 6

शुभ रंग- जांभळा

मिथुन: या राशीच्या व्यक्तींना आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल. मित्र परिवारात गप्पागोष्टी करताना विचारपूर्वक बोला. प्रियकर व्यक्तीसोबत आजचा दिवस तुमचा चांगला जाईल.

शुभ उपाय- गाईला खिचडीचा नैवेद्य दाखवा.

शुभ दान- गरीब आजारी व्यक्तींना फळ दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- केशरी

कर्क: कर्क राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस हा मित्र मंडळीसह आनंदात वेळ घालवण्यात जाईल. तसेच संध्याकाळी काही पैशांची चणचण भासेल. आई-वडिलांचा कोणत्याही कामात सल्ला घ्या. तर प्रिय व्यक्तीकडून तुमच्या चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल.

शुभ उपाय- घरातील भिंतीवर लाल रंगाचा बल्ब लावा त्यामुळे घरातील सुख वाढेल.

शुभ दान- मजूरांना जलेबी खाऊ घाला

शुभ अंक- 2

शुभ रंग- क्रिम कलर

सिंह: आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अशक्तपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.

शुभ उपाय- कुत्र्याला जेवण द्या.

शुभ दान- गरजूंना अंथरुण दान करावे.

शुभ अंक- 1

शुभ रंग- लाल

कन्या: कन्या राशीतील व्यक्तींनी आज ध्यान आणि योगसाधना केल्यास दिवस उत्तम जाईल. नवीन घरातील कामे सुरु करण्यासाठी चांगला दिवस आहे. घरातील मंडळींमुळे त्रस्त वाटेल. आजच्या दिवशी केलेली सर्व कामे पूर्ण होतील. प्रिय व्यक्ती किंवा मित्रपरिवारासह बाहेर जाण्यास वेळ मिळेल.

शुभ उपाय- सरस्वतीचे पूजन करा.

शुभ दान- अन्न दान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- जांभळा

तुळ: आजच्या दिवशी घरातील मंडळींसोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम दिवस आहे. पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रवासाचा योग संभवतो. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल. तसेच राहिलेली कामे वेळेआधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

शुभ उपाय- दही खाऊन घराबाहेर जा.

शुभ दान- ब्राम्हणाला पपई किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्रदान करा

शुभ अंक- 5

शुभ रंग- हिरवा

वृश्चिक: वृश्चिक राशीतील मंडळींनी आज गोड शब्दात दुसऱ्यांची वागा. सर्व कामे पूर्ण होतील. प्रकृती उत्तम राहील. घरातील वातावरण उत्साही राहील. प्रिय व्यक्तीसोबत खास दिवस जाईल. पैसे खर्च करताना विचार करा.

शुभ उपाय- लक्ष्मीची पूजा करा.

शुभ दान- लाल झेंडा किंवा नारळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- करडा

धनु: उद्योगधंद्यातील मंडळींना कामात आजच्या दिवशी धनलाभ होणार आहे. प्रिय व्यक्तीसोत दिवस घालवाल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. घाईमध्ये कोणताही निर्णय घेणे टाळा.घरातील मंडळींचे साथ लाभेल.

शुभ उपाय- भगवान शंकराची उपासना करा.

शुभ दान- आजारी व्यक्तींना केळी दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- जांभळा

मकर: मकर राशीतील व्यक्तींसाठी आजच्या दिवसात मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल. व्यावसायाशी संबंधित कामे करण्याच्या दृष्टीने प्रवास होईल. लहान मुलांशी निगडीत आनंदाची बातमी मिळेल. प्रिय व्यक्तीशी वाद करणे टाळा.

शुभ उपाय- पक्ष्यांना अन्नदान करा.

शुभ दान- गरीब व्यक्तींना डाळींब दान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग - पांढरा

कुंभ: आजच्या दिवसाची तुमची सुरुवात ही फारशी उत्तम होणार नाही. पैसे जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. महिलांशी भांडण करणे टाळा आणि वेळेचा सदुपयोग करा.नोकरीसाठी आजचा दिवस उत्तम राहील.

शुभ उपाय- गाईला गुळाच्य चपातीचा नैवद्य दाखवा.

शुभ दान- धार्मिक पुस्तकाचे दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- गुलाबी

मीन: मीन राशीतील व्यक्तींनी आजच्या दिवशी प्रकृतीकडे जास्त लक्ष द्या. नोकरीत आपल्या कामाचे कौतुक केले जाईल. घरातील मंडळींशी आदराने वागा. मित्रपरिवाराशी गाठभेट होईल. प्रिय व्यक्तीसोबत वाद घालणे टाळा.

शुभ उपाय- कुबेर मंत्राचे पठन करा.

शुभ दान- फळ दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- निळा