प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : Youtube)

Men's Lifestyle : पुरुषांसाठी मॉर्निंग रुटीन कसे असायला हवे हे आपण पाहिले, आता यातील एक एक घटकांबद्दल माहिती घेऊ. पुरुषांच्या एकंदर रुबाबदार दिसण्यासाठी ‘ग्रूमिंग’ (Grooming) हा शब्द वापरला जातो. यामध्ये मुख्यत्वे 4 गोष्टींवर भर दिला जातो- तुमचे केस, चेहरा, कपडे आणि पादत्राणे. यातील सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा चेहरा. स्वतःला मिळालेला रंग बदलने हे आपल्या हातात नाही, मात्र जी त्वचा आपणाला मिळाली आहे ती व्यवस्थित ठेवणे आपल्या हातात आहे. काही उत्पादने आणि घरगुती उपाय करून त्वचेचा रंग बदलने काही प्रमाणात शक्य होते मात्र त्याऐवजी तुमची त्वचा क्लिअर आणि नितळ कशी राहील याकडे लक्ष द्या. तर आपल्या चेहऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनामध्ये सर्वात बेसिक आणि महत्वाचे म्हणजे तुमचा फेसवॉश (Face Wash)

तुमची त्वचा डॅमेज होणे, पिंपल (Pimple), सावळेपण अशा अनेक गोष्टींसाठी तुमचा चुकीचा फेसवॉश कारणीभूत आहे. चेहऱ्याची त्वचा ही फार सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे तुम्ही जे काही चेहऱ्यासाठी वापराल ते चेहऱ्याला सूट झाले नाही तर त्याची रिअॅक्शन ही होतेच. त्यामुळे लक्षात घ्या नेहमी आपल्या त्वचेचा पोत किंवा प्रकारानुसार फेसवॉशची निवड करा. तर त्वचेचे ड्राय (Dry skin), नॉर्मल (Normal skin) आणि ऑयली (Oily skin) असे तीन प्रकार पडतात. तुमची त्वचा नेमकी कोणती आहे हे पाहूनच फेसवॉशची निवड करा.

ड्राय स्किन-  चेहऱ्यावरील पाणी लवकर सुकत असेल, फेसवॉश किंवा साबणाचा वापर केल्यावर त्वचा आत ओढल्यासारखी वाटत असेल समजा तुमची ड्राय स्किनआहे. ड्राय स्किनअसलेल्या लोकांनी फेसवॉश सोबतच अजून थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यावर फेसवॉश वापरण्याआधी क्लिंझर (Cleanser) चा वापर नक्की करा. स्क्रबचा वापर कमी करून, घराच्या घरी बनवलेला मुलतानी मातीचा पॅक वापरा. याचसोबत टोमॅटो लावल्यानेही चेहऱ्याचा ड्रायनेस कमी होतो. रात्री चेहरा फेसवॉशने धुतल्यानंतर चेहऱ्याला Moisturiser नक्की लावा.

> Dove Men Care Hydrate

> Mamaearth Ubtan Natural Face Wash for Dry Skin

> Garnier Clean+ Smoothing Cream Cleanser

> Himalaya Herbals Moisturizing

> Nivea Daily Essentials Gentle Cleansing Cream Wash

> Lotus Herbals Jojoba Active Milli Capsules Nourishing Face Wash

ड्रायस्किनवाल्यांसाठी ही काही फेसवॉश उपलब्ध आहेत, आपल्या बजेटनुसार तुम्ही यातील कोणतेही वापरू शकता.

नॉर्मल स्किन– हा सर्वात सेफ स्किन टाईप आहे. यामध्ये तुमचे त्वचा ही ड्राय आणि ऑयली यांचे मिक्चर असते. ही स्किनअसलेल्या लोकांसाठी मॉर्निंग रुटीन फॉलो करणे, दररोज फेसवॉश आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा स्क्रब हे सोडले तर इतर काही करायची गरज नसते. चला तर पाहूया नॉर्मल स्किन असलेल्या लोकांसाठी कोणकोणते फेसवॉश उपलब्ध आहेत.

> Pond’s Pure White Anti Pollution Face Wash

> Himalaya Moisturizing Aloe Vera Face Wash

> Clean and Clear Foaming Face Wash

> Kaya Skin Clinic Soothing Cleansing Gel

> Biotique Bio Honey Gel Refreshing Face Foam

ऑयली स्किन– हा प्रकार असलेल्या लोकांनी आपल्या त्वचेची सर्वात जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. तेलकट त्वचा असल्यास मेकअप फार काळ टिकत नाही. तसेच नाकावर आणि इतर ठिकाणीही तेलकट थर निर्माण झाल्याने चेहरा फ्रेश वाटत नाही. त्यामुळे फेसवॉश निवडताना काळजी घ्या, नाहीतर पिंपल आणि अॅक्नेच्या समस्या उद्भवू शकतात.

> Lotus Herbals Teatreewash

> Himalaya Herbals Oil Clear Lemon Face Wash

> VLCC Acne Care Oil Control Face Wash

> Neutrogena Oil Free Acne Wash

> Nivea Men Oil-Control Face Wash

> Garnier Men Oil-Clear Face Wash

> Vaseline Men Oil Control Face Wash

तर ही नावे फक्त पर्याय म्हणून दिली आहेत, तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही थोडा रिसर्च करून तुम्हाला हवे ते फेसवॉश निवडू शकता. दिवसातून कमीत कमी दोन वेळा, सकाळी उठल्यावर आणि रात्री घरी परत आल्यावर फेसवॉशचा वापर करा. फेस वॉश वापरल्यानंतर ताबडतोब चेहऱ्याला Moisturizer लावा.