राशी भविष्य- (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

Aajche Rashi Bhavishya 24th December 2023  in Marathi: आजचे राशीभविष्य, रविवार 24 डिसेंबर 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.

मेष (Aries Horoscope Today): मेष राशीच्या लोकांसाठी आज कौटुंबिक जीवन सुखी असेल. परंतु आपल्या पती/पत्नीला आरोग्यविषयक तक्रारी देखील ग्रासू शकतात. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस समाधानाचा असेल. आजचा दिवस कामाचा ध्यास घेणाऱ्यांसाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होईल. आई-वडिलांच्या इच्छा पूर्ण कराल.

शुभ उपाय- सकाळी हनुमान चालीसा वाचा.

शुभ दान- मंदिर उभारणीच्या कामाला हातभार लावा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- पिवळा

वृषभ (Taurus Horoscope Today): वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. आज बारीकसारीक मतभेद टाळा. आज वाद टाळणे उपयुक्त ठरेल. आजचा दिवस नोकरी-धंद्याच्या दृष्टीने श्रेयस्कर असेल. गुंतवणुकीची एक चांगली संधी प्राप्त होण्याची शक्यता.

शुभ उपाय- सकाळी अंघोळीनंतर तुळशीची पूजा करा.

शुभ दान- काचेच्या वस्तूचे दान करा .

शुभ अंक- 5

शुभ रंग- करडा

मिथुन (Gemini Horoscope Today): नोकरी व धंद्यासाठी आजचा दिवस अनुकूल असेल. व्यवसायात तेजी अथवा नोकरीत वृद्धी दिसून येईल. आर्थिक दृष्ट्या आजचा काळ चांगला आहे. उत्पन्नाची साधने वाढवण्याच्या संधी चालून येतील, मात्र धोकादायक गुंतवणुकीपासून सावधान असावे. जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

शुभ उपाय- सकाळी महादेवाच्या पिंडीला बेलपत्र वाहा.

शुभ दान- भुकेल्याला जेवण द्या.

शुभ अंक- 8

शुभ रंग- लाल

कर्क (Cancer Horoscope Today): कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. आज काही अडचणींना सामोरे जावे लागेल, मात्र त्यातून सकारात्मक निकाल हाती येतील. आज मानसिक संतुलन बिघडवू देऊ नका. शांत राहून कामे पूर्णत्वास न्या. कुटुंबियांमध्ये क्लेष निर्माण होण्याचे संकेत. आज शक्य असल्यास दूरचा प्रवास टाळा.

शुभ उपाय- गायत्री मंत्राचा जप करा.

शुभ दान-  धातूच्या वस्तूचे दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- निळा

सिंह (Leo Horoscope Today): सिंह राशीच्या लोकांनी आज आपले स्वास्थ्य सांभाळावे. नोकरीत बदल होण्याची शक्यता. वरिष्ठाबरोबर वाद टाळा. आज  धार्मिक व आध्यात्मिक कार्य तुम्हाला सुख व शांती देतील. खिशावरील ताण वाढेल त्यामुळे खर्च सांभाळून करा.

शुभ उपाय- कुलदैवतेची पूजा करा.

शुभ दान- गरजू व्यक्तीला आर्थिक मदत करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- हिरवा

कन्या (Virgo Horoscope Today): कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुखावह असेल. उत्पन्नाची साधने वाढतील. आप्तांचा व नातेवाईकांचा आधार लाभेल. अपत्य संबंधित ताण-तणाव जाणवतील. व्यवसायात वाढ दिसून येईल. मात्र आज आरोग्याच्या समस्या जाणवतील त्यामुळे कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.

शुभ उपाय- सकाळी घराबाहेर पडताना खिशात दोन लवंगा ठेवा.

शुभ दान- धान्याचे दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- जांभळा

तुळ (Libra Horoscope Today): तूळ राशीसाठी आजचा संमिश्र असेल. आज सुखी, समाधानी व निरोगी राहाल. परंतु जीभेवर ताबा ठेवणे शहाणपणाचे ठरेल. अनावश्यक खर्च करू नयेत. व्यवसायात वाढ दिसून येईल, मात्र गुंतवणूक विचारपूर्वक करा. नवीन संधी वाट्याला येण्याची शक्यता.

शुभ उपाय- सकाळी कुलदैवतेच्या नावाचा जप करा.

शुभ दान- कोणत्याही गोड पदार्थाचे दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- गुलाबी

वृश्चिक (Scorpio Horoscope Today): आज घरात संतुलित वातावरण ठेवणे फायद्याचे ठरेल. वादविवाद, अनावश्यक चर्चा टाळा. व्यावसायिक पातळीवर देखील अडचणींना तोंड द्यावे लागेल, मात्र जिभेवर ताबा ठेवा. स्वास्थ्य विषयक काळज्या मिटण्याची शक्यता. घरातील मोठ्यांचा सल्ला फायद्याचा ठरेल.

शुभ उपाय- वाहत्या पाण्यात नारळ सोडा.

शुभ दान- मंदिरात तेलाचे दान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पांढरा

धनु (Sagittarius Horoscope Today): आज यश प्राप्तीसाठी अधिक परिश्रम करावे लागतील. अनावश्यक प्रवास हितकारक ठरणार नाही. व्यवसायात उधारी देणे टाळा. मनात काही नकारात्मक भावना येऊ शकतात, त्यामुळे महत्वाचे निर्णय शक्यतो घेऊ नका. जोडीदाराचा सल्ला फायद्याचा ठरू शकेल.

शुभ उपाय- पिंपळाच्या झाडाला अर्घ्य द्या.

शुभ दान- गाईला दुध मिश्रित भात घाला.

शुभ अंक- 6

शुभ रंग- पोपटी

मकर (Capricorn Horoscope Today): आज आर्थिक बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. कर्ज किंवा उसणे घेणे टाळा. गुंतवणूक करताना सर्व दृष्टीकोनातून विचार करा. कुटुंबीयांसोबत काही मतभेद होण्याची शक्यता, मात्र गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न करा.

शुभ उपाय- जेवणानंतर गुळ खा.

शुभ दान- पक्ष्यांना दाणे घाला.

शुभ अंक- 2

शुभ रंग- लाल

कुंभ (Aquarius Horoscope Today): आजचा दिवस सकारात्मक राहील. मनातील उर्जा व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी फलदायी ठरेल. आध्यात्मिक प्रवास घडण्याची शक्यता. आरोग्य साथ देईल, परंतु पथ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. नवीन काही सुरु करण्याचे संकेत मिळण्याची शक्यता.

शुभ उपाय- महादेवाच्या पिंडीला बेलपत्र वाहा.

शुभ दान- गरजूंना अंथरून दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- निळा

मीन (Pisces Horoscope Today): विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस फलदायी ठरेल. काहीजण कारणाशिवाय तुमच्या विरुद्ध जातील, मात्र त्यावर वेळ आणि उर्जा खर्च करू नका. कर्जांवरून देखील वाद-विवाद होऊ शकतील. मोठी गुंतवणूक टाळलेली बरी. नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी संध्याकाळी मंदिरात देवाचे दर्शन घ्या.

शुभ उपाय- सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्या.

शुभ दान- गायीला चारा द्या.

शुभ अंक- 4

शुभ रंग- पिवळा