Photo Credit : Wikimedia

Karwa Chauth Recipes: कार्तिक मास च्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथिला करवा चौथ साजरा केला जातो. यंदा करवा चौथ 4 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे.या दिवशी विवाहित महिला दिवसभर आपल्या पतींच्या दीर्घ आयुष्यासाठी निर्जल उपवास ठेवतात आणि संध्याकाळी चंद्राला पाहून उपवास सोडतात. या दिवशी घरात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ गोड-धोड बनवले जाते जे संपूर्ण कुटुंब आणि पती-पत्नी एकत्र बसून खातात.करवा चौथ हे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी ठेवले जाते, तसेच हा दिवस पती-पत्नीच्या नात्याचा उत्सव म्हणून देखील मानला जातो. या दिवशी पती आपल्या पत्नीला अनेक भेटवस्तू देतात. करवा चौथच्या निमित्ताने जरी महिला दिवसभर उपवास करतअसली तरी रात्रीच्या वेळी चंद्राच्या पूजेनंतर उपवास करून भोजन करतात. म्हणून या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन बनवले जातात.परंतु आज आम्ही तुम्हाला अशाच एका रेसिपीविषयी सांगणार आहोत,ज्यामुळे तुमचे करवा चौथ अधिक खास होईल. करवा चौथवर ही चवदार केसरी जाफरानी खीर बनवा. चला तर मग जाणून घेऊयात ही खीर कशी बनवाली जाते.(How to Make Curd at Home: घरात विरजण नसताना कसं बनवाल घट्टसर दही? Watch Recipe)

खीर बनवण्यासाठी साहित्य

अर्धा कप भिजलेला बासमती तांदूळ

2 कप दूध

एक चमचा वेलची पूड

5 चमचे साखर केशरचे काही तुरडे(जाफरानी)

1/2 चमचे तूप

10-15 मनुका

बदाम आणि काजू सजवण्यासाठी

केसरी जाफरानी खीर बनवण्याची रेसिपी

प्रथम तांदूळ धुवून 2 तास भिजवा नंतर खीर बनवण्यासाठी एका पैन मध्ये तूप गरम करा

यानंतर त्यात ड्रायफ्रूट्स घाला आणि थोडावेळ शिजवा. ही खीर मायक्रोवेव्ह प्रूफ डिशमध्ये बनवा.

10 मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह मोडमध्ये (850 डब्ल्यू) ठेवा, नंतर दूध आटवा जेणेकरून ते घट्ट होईल

नंतर त्यात साखर घाला आणि मंद आचेवर शिजवा, डिश बाहेर काढा थोड थंड करा

अशावेळी खीर जास्त घट्टझाली तर तुम्ही थोडेसे दूध गरम करुन त्यात घाला आणि वरुन ड्रायफ्रूट्स घालुन सजवा सर्व्ह करावा.

आहे की नाही सोपी रेसिपी तर मग यंदाच्या करवा चौथ ला ही खीर नक्की बनवा.