दिवाळी हा रोषणाईचा सण आहे. हिंदू परंपरेतील दिवाळी हा एक मोठा सण आहे. भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जाणार्‍या या सणामध्ये दिव्यांची आरास, फटाके, नवीन कपडे आणि भेटवस्तू यांची रेलचेल असते.दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे 'लक्ष्मीपूजन.' काही वर्षी 'नरक चतुर्दशी' आणि 'लक्ष्मीपूजन'एकाच दिवशी येते. यंदाही हाच योग जुळून आला आहे. अश्विन कृष्ण अमावास्येला लक्ष्मी पूजन असते. त्यामुळे यंदा शनिवार, 14 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी घरोघरी लक्ष्मीची पूजा केली जाते. (Dhanteras Easy Rangoli Designs: धनत्रयोदशीच्या दिवशी काढा या सोप्या कलश रांगोळी ( Watch Video )

व्यापारी वर्गासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असतो.भारतीय परंपरेमध्ये प्राचीन काळापासून घराबाहेर अंगणात रांगोळी काढली जाते. रांगोळी ही दिवाळीतील एक प्रमुख आकर्षणाचा भाग असतो. आज आपण पाहणार आहोत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काढता येणारी सुंदर आणि सोपी रांगोळी डिजाईन.

लक्ष्मीची ६ प्रकारे काढता येणारी पावले

लक्ष्मीपूजनासाठी खास कमळ आणि लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी 

फेविकॉल बॉटल सुद्धा काढू शकाल अशी रांगोळी

सोपी आणि छोटी लक्ष्मीपूजन रांगोळी 

तेव्हा उद्या म्हणजेच लक्ष्मीपूजना च्या दिवशी खुप सोप्या जास्त वेळ जाणार नाही अशा या रांगोळी डिझाईन नक्की आपल्या दारासमोर काढा आणि दाराची शोभा वाढवा.