Isha Anand Wedding: 'ईशा-आनंद' च्या विवाहसोहळ्यात Mukesh Ambani झाले भावूक (Video)
अंबानी-पिरामल कुटुंबिय (Photo Credit-IANS)

रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani)  यांची कन्या ईशा अंबानी (Isha Ambani) आणि उद्योगपती आनंद पिरामल (Anand Piramal) यांचा विवाहसोहळा नुकताच संपन्न झाला. उदयपूरमध्ये प्री वेडींग सेलिब्रेशन झाल्यानंतर मुंबईतील अंबानी हाऊसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. थाटामाटात रंगलेल्या या विवाहसोहळ्यात देशातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. तर संपूर्ण बॉलिवूड या विवाहसोहळ्यात अवतरलं होतं. ईशा अंबानीचा विवाहसोहळा हा भारतातील सर्वात महागडा विवाहसोहळा ठरला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विवाहसोहळ्यात सुमारे 600 लोक उपस्थित होते. इशाच्या संगीत कार्यक्रमाच्या सोहळ्यावेळी Hilary Clinton थिरकल्या बॉलिवूडच्या गाण्यावर

या लग्नसोहळ्यात मुलीची पाठवणी करताना वडीलांच्या भावना काय असतात, यावर महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) आपल्या दमदार आवाजात बोलत असताना मुकेश अंबानी मात्र अत्यंत भावूक झाले. हिलेरी क्लिंटन, प्रणव मुखर्जीसह अनेक बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी; पाहा फोटोज

शुक्रवारी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ ग्रार्डनमध्ये ईशा-आनंदच्या लग्नाच्या ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले आहे. यापूर्वी उदयपूर येथी प्री वेडींग सेलिब्रेशनला बॉलिवूडमधील अनेक स्टार्सने रंगत आणली. या सेलिब्रेशनमध्ये शाहरुख खान, अभिषेक बच्चन, प्रियंका चोप्रा, निक जोनस, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग यांसारखे अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते.