रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन आणि भारतातील सर्वात श्रीमंत, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) हिचा विवाह उद्योगपती आनंद पिरामलसह (Anand Piramal) 12 डिसेंबरला मुंबईत होणार आहे. त्यापूर्वी ईशा-आनंदच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. राजस्थानमधील (Rajasthan) उदयपूर (Udaipur) येथे प्री वेडींग सेलिब्रेशनसाठी जगभरातून दिग्गजांनी हजेरी लावली आहे. तर बॉलिवूड स्टार्सही मांदियाळी पाहायला मिळत आहे. Isha Ambani-Anand Piramal यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात; अंबानींकडून 5100 लोकांसाठी अन्नसेवा
8 डिसेंबरला सलमान खान (Salman Khan), ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), कतरिना कैफ (Katrina Kaif) यांसारखे अनेक बॉलिवूड स्टार्स प्री वेडींग सेलिब्रेशनसाठी उदयपूरला रवाना झाले.
पाहुया सेलिब्रेशनमधील काही खास फोटोज...
ईशा अंबानीच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी हिलेरी क्लिंटन (Hillary Clinton) उदयपूरमध्ये दाखल झाल्या.
थाटापाटात पार पडणाऱ्या या सोहळ्यात नीता अंबानींनी आपल्या नृत्याने चार चॉंद लावले.
12 डिसेंबरला ईशा आणि आनंद हिंदू परंपरेनुसार मुंबईतील अंबानी हाऊसमध्ये विवाहबद्ध होतील.