
शेवटी या वर्षातील सर्वात चर्चित लाग्नापैकी एक असलेल्या ईशा अंबानीच्या लग्नाला सुरुवात झाली आहे. तब्बल 700 करोड रुपये इतका खर्च केल्या जाणाऱ्या या लग्नाची दीपिका आणि प्रियंका यांच्या लग्नाइतकीच चर्चा झाली होती. मुकेश अंबानी यांच्या ऍन्टिलिया (Antilia) या निवासस्थानी हा विवाहसोहळा पार पडत आहे. यासाठी ऍन्टिलिया अगदी नटून थटून पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभा आहे. हळू हळू दिग्गजांची मांदियाळी या लग्नासाठी उपस्थित होत आहे. या लग्नासाठी जगातील अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते. यापैकी एक हिलेरी क्लिंटन या एक होत्या.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीदेखील या लग्नासाठी पोहचले आहेत.
राजकीय वर्तुळातील मान्यवरांसोबतच बॉलीवूड मधील अनेक मंडळी या लग्नात सहभागी होणार आहेत. नुकतेच अमिताभ बच्चन आपल्या परिवारासह पोहचले आहेत.
त्याचसोबत आपल्या मिनी हनिमून नंतर नवीन लग्न झालेले जोडपे प्रियंका आणि निकदेखील या लग्नासाठी उपस्थित झाले आहेत. आलीय भट्टदेखील पोहचली आहे.
टीना अंबानी
आमीर खानदेखील आपल्या पत्नीसह पोहचला आहे.
बॉलीवूडसोबतच क्रिकेट विश्वातील एक मोठे नाव म्हणजे सचिन तेंडुलकर, आपल्या पत्नी आणि मुलांसह दाखल झाला आहे. याचसोबत हरभजन सिंगदेखील पत्नीसह उपस्थित आहे.
लग्नाचे इतर काही फोटो
ईशाच्या लग्नात सर्वप्रथम तिची बॉलिवूडमधील बेस्ट फ्रेंड अभिनेत्री कियारा आडवाणी पोहोचली. त्यांनतर जया बच्चन, नव्या नवेली नंदा, विधु विनोद चोप्रा, अनुपमा चोप्रा, मनीष मल्होत्रा, वैभवी मर्चेंट, शिल्पा शेट्टीसुद्धा लग्नस्थळी दाखल झाले आहेत.