इशाच्या संगीत कार्यक्रमाच्या सोहळ्यावेळी Hilary Clinton थिरकल्या बॉलिवूडच्या गाण्यावर
हिलरी क्लिंटन (फोटो सौजन्य-ट्विटर)

मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांची कन्या इशा अंबानी(Isha Ambani) आज आनंद पिरामल (Anand Piramal) याच्या सोबत लग्नगाठ बांधणार आहे. तर इशाच्या लग्नासाठी देशविदेशीतील मंडळींनी या लग्नाला उपस्थिती लावत आहेत. मात्र सध्या सोशल मिडियावर संगीत कार्यक्रमाच्या वेळचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये अमेरिकेच्या नेत्या आणि माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन(Hilary Clinton)  बॉलिवूडच्या तालावर थिरकताना दिसल्या आहेत.

हिलरी क्लिंटन यांनी संगीत कार्यक्रमासाठी रविवारी त्या उदयपूरमध्ये दाखल झाल्या होत्या. या सोहळ्यासाठी संपूर्ण बि-टाऊनने संगीत कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी हिलरी यांनी ‘तुने मारी एंट्री’या, ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या बॉलिवूडच्या गाण्यांवर थिकरताना दिसल्या. तसेच अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री जॉन केरी(John Kerry) सुद्धा थिरकताना दिसले.

तसेच हिलरी यांचे अंबानी यांच्याशी कौटुंबिक संबंध खूप चांगले आहेत. तर हिलरी फाऊंडेशनकडून दरवर्षी अंबानीकडून मोठा निधी दिला जातो.