Horoscope Today आजचे राशीभविष्य, बुधवार 29 मार्च 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope (File Image)

 

Horoscope Today 29 March 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, बुधवार 29 मार्च 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष (Aries Horoscope Today): आजचा दिवस मध्यम राहील. कामाच्या ठिकाणी तसेच घरात तणाव जाणवेल. गोड बोलून काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करा मात्र यासाठी रागावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता. आज शक्यतो दूरचा प्रवास टाळा.

शुभ उपाय- सकाळी उठून पूजा करून गणेशाला दुर्वा वाहा.

शुभ दान- मंदिरात वस्त्र दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- पिवळा

वृषभ (Taurus Horoscope Today):  आजचा दिवस मिश्र असेल. आरोग्याकडे लक्ष द्या. वादविवाद-चर्चा करू नका. आर्थिक बाबीवर व्यवस्थित योजना बनवू शकाल. मात्र काही काळानंतर या योजना अमलात आणा. आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल.

शुभ उपाय- गायत्री मंत्राचा जप करा.

शुभ दान- गरजूला धातूचे दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- पांढरा

मिथुन (Gemini Horoscope Today): आजचा दिवस शुभ आहे. आपल्या मधुर वाणीने आपण इतरांचे मन जिंकू शकता. नोकरीच्या ठिकाणी पाठीवर कौतुकाची थाप मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आरोग्याचा समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.

शुभ उपाय- वाहत्या पाण्यात नारळ सोडा.

शुभ दान- कोणत्याही गोड पदार्थाचे दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- लाल

कर्क (Cancer Horoscope Today): नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. व्यावसायिकांना धंद्यात वाढ दिसेल. मात्र आज कोणालाही पैसे उसने देणे टाळा. अपुरे व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पोटाच्या किंवा डोळ्याच्या समस्या उद्भवतील.

शुभ उपाय- शंकराच्या पिंडीला बेल-गंध वाहा.

शुभ दान- कोणत्याही काचेच्या वस्तूचे दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- हिरवा

सिंह (Leo Horoscope Today): आजचा दिवस कामासाठी खूप अनुकूल आहे. नवीन कार्ये अथवा प्रकल्प सुरु कराल. नोकरी करणार्‍या व्यक्तीने उच्च अधिकार्‍यांशी संबंध बिघडू नयेत याची काळजी घ्यावी. मुलांकडून चांगली बातमी मिळाल्याने मन आनंदित राहील. स्वभावातील स्वार्थीपणामुळे जवळच्या मित्रासोबतचे नाते बिघडू शकते.

शुभ उपाय- घरातून बाहेर पडताना थोडे काळे तीळ खिशात बाळगा.

शुभ दान- मंदिरात तेलाचे दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- केशरी

कन्या (Virgo Horoscope Today): आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मात्र यामध्ये जवळच्या व्यक्तीचे मन दुखावले जाण्याची शक्यता आहे. आज जिभेवर ताबा ठेवल्यास जोडीदाराची उत्तम साथ लाभू शकते. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करणे टाळा.

शुभ उपाय- सूर्याला जल अर्पण करा.

शुभ दान- अन्नदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- निळा

तुळ (Libra Horoscope Today): दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. व्यापाऱ्यांनी सांभाळून व्यवसाय करावा. जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता.

शुभ उपाय- पिंपळाच्या झाडावर जल चढवावे.

शुभ दान- वस्त्रदान करा

शुभ अंक- 2

शुभ रंग- गुलाबी

वृश्चिक (Scorpio Horoscope Today): आज ग्रहांची अपेक्षित साथ लाभणे अवघड आहे. मात्र आत्मविश्वासाने केलेले काम पूर्णत्वास जाईल. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. आळशीपणामुळे कोणतेही महत्वाचे काम टाळू नका. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल, जिचा भविष्यात फायदा होईल.

शुभ उपाय- गायत्री मंत्राचा जप करा.

शुभ दान- पक्ष्यांना दाणे द्या

शुभ अंक- 7

शुभ रंग- करडा

धनु (Sagittarius Horoscope Today): कौटुंबिक आणि आर्थिक समस्या कमी होण्यास मदत मिळेल. व्यवसाय अथवा नोकरीची पुढची दिशा ठरवण्यासाठी सकारात्मक चर्चा घडेल. भूतकाळातील गोष्टी आठवून मन विचलित होईल मात्र त्यावर जास्त विचार करणे टाळा.

शुभ उपाय- मंदिरात तेलाचा दिवा लावा.

शुभ दान- धान्य दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- जांभळा

मकर (Capricorn Horoscope Today): ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा. आरोग्य उत्तम राहील. प्रवास काळजीपूर्वक करा. पाण्यापासून आज दूर रहा.

शुभ उपाय- गायीला चारा द्या.

शुभ दान- इच्छेनुसार पैसे दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- लाल

कुंभ (Aquarius Horoscope Today): महत्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण होईल. नोकरी अथवा व्यवसायामधील अडकलेले काम पूर्ण होईल. आज निर्माण झालेले भावनिक नाते भविष्यात उपयोगी पडेल. मित्रांच्या साथीने नवीन योजना आखाल. पैशांच्या गुंतवणुकीचे नियोजन करणे गरजेचे आहे.

शुभ उपाय- पांढरे वस्त्र परिधान करा

शुभ दान- पांढऱ्या रंगाची वस्तू अथवा वस्त्र दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- पांढरा

मीन (Pisces Horoscope Today): महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला नाही. नोकरीमध्ये दिलासादायक गोष्टी घडतील. इच्छित कार्ये पूर्णत्वास जातील. खरेदीसाठी उत्तम वेळ. मुलांशी खटके उडण्याची शक्यता परंतु त्यामुळे भावनिक होऊ नका. जवळचे लोक गैरफायदा घेण्याची शक्यता त्यामुळे सावध रहा.

शुभ उपाय- सूर्याला अर्घ्य द्या.

शुभ दान- पिठाचे दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- हिरवा