Horoscope Today आजचे राशीभविष्य, मंगळवार 28 मार्च 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
राशीभविष्य

Horoscope Today 28 March 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, मंगळवार 28 मार्च 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष (Aries Horoscope Today): स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आज चांगला बदल झालेला दिसून येईल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. आश्वासनांपासून दूर राहा. घरासंबंधीचे प्रश्न सोडवू शकाल.

शुभ उपाय- वाहत्या पाण्यात नारळ सोडा.

शुभ दान- गरजूला उडीद, मूग आणि तूर डाळ दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- लाल

वृषभ (Taurus Horoscope Today):  कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्याचे आज चीज होणार आहे.

शुभ उपाय- पिंपळाच्या झाडावर जल चढवावे.

शुभ दान- अन्नदान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- गुलाबी

मिथुन (Gemini Horoscope Today):  नोकरी करणाऱ्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता भासेल, परंतु आधी केलेल्या व्यर्थ खर्चाच्या कारणाने जवळ पर्याप्त धन नसेल. आजच्या दिवशी पैसे उसने घेणे टाळा. काही समस्या उद्भवतील, परंतु वास्तववादी राहा. घाईने कोणत्याही व्यावसायिक, कायदेशीर कागदपत्रांवर सही करू नका.

शुभ उपाय- वृद्ध ब्राह्मणांसोबत आपले अन्न वाटून घ्या.

शुभ दान- गरजूला धान्य दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- निळा

कर्क (Cancer Horoscope Today): कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ आहे. आज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. नवीन प्रेमप्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे, पण आपली खाजगी आणि गुप्त माहीती लगेच उघड करु नका. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारणापासून लांब रहा.

शुभ उपाय- गणपतीला दुर्वा अर्पण करा.

शुभ दान- आज गरजूला साखरेचे किंवा गोड पदार्थाचे दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- केशरी

सिंह (Leo Horoscope Today): घरगुती वस्तुंची बेफिकीरपणे हाताळणी करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला असेल, तर आज तो तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल, हे तुम्हाला आज कळेल. आज कौतुकाची थाप मिळेल.

शुभ उपाय- वाहत्या नदीमध्ये नाणे सोडा

शुभ दान- इच्छेनुसार पैसे दान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पिवळा

कन्या (Virgo Horoscope Today): गरजेच्या कामाला वेळ न देणे आणि व्यर्थ कामात वेळ घालवणे आज तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. अनेक विषयांवर एकमान्यता होणार नाही त्यामुळे आजचा दिवस खूप चांगला नाही. परिणामी तुमचे नातेसंबंध कमकुवत होतील. आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

शुभ उपाय- घरातून बाहेर पडताना दही-साखर खा

शुभ दान- गरजू व्यक्तीला तवा अथवा धातूचे भांडे दान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- जांभळा

तुळ (Libra Horoscope Today): व्यावसायिक दृष्ट अनेक गोष्टींमध्ये आपण आघाडीवर राहाल. कला, साहित्य, व्यापार, शिक्षण, राजकारण अशा क्षेत्रांतील लोकांसाठी शुभ दिवस. काही शुभ घटनांचे संकेत मिळू शकतात. नव्य संधी चालून येतील. मात्र आश्वासने, प्रलोभने यांना भुलू नका.

शुभ उपाय- लक्ष्मीमातेची पूजा करून लाल फुल अर्पण करा.

शुभ दान- पिवळ्या रंगाची मिठाई दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- हिरवा

वृश्चिक (Scorpio Horoscope Today): आज रखडलेल्या कामात यश व सफलता प्राप्त होईल. अनुकूल ग्रहांच्या मदतीने प्रतिष्ठा वाढेल. डोळ्यांचा त्रास संभवतो. वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळा. प्रकृती स्वास्थ्य जपा.

शुभ उपाय- घरातून बाहेर पडताना थोडे काळे तीळ खिशात बाळगा.

शुभ दान- मंदिरात तेलाचे दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- पांढरा.

धनु (Sagittarius Horoscope Today): यशाचा मार्ग सोपा नाही, परंतु आजच्या मेहनतीचे फळ लवकरच मिळेल. मरगळ सोडून नव्या उत्साहाने कामाला सुरुवात करा. आर्थिक लाभ संभवतो. वरिष्ठांची नाराजी राहील. प्रकृतीच्या काही तक्रारी उद्भवू शकतात. प्रवासाची शक्यता.

शुभ उपाय- निळे वस्त्र परिधान करा किंवा निळा रुमाल जवळ बाळगा.

शुभ दान- गरजूला गहू, ज्वारी अथवा तांदळाचे दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- निळा

मकर (Capricorn Horoscope Today): क्षुल्लक कारणाने झालेले गैरसमज स्वतःहून दूर कराल. आज हातून काही मोठी कामे किंवा मोठे आर्थिक व्यवहार घडण्याची शकयता. मात्र त्यासाठी मन शांत ठेवा ज्यामुळे लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. कौटुंबिक कुरबुरी राहतील मात्र त्याकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर भविष्यात समस्या उद्भवतील.

शुभ उपाय- आज घरातून बाहेर पडताना आई-वडीलांचे आशीर्वाद घ्या.

शुभ दान- आपल्या जेवणातील काही भाग पक्ष्यांना दान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- गुलाबी

कुंभ (Aquarius Horoscope Today): व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता. आज घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो, ज्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. कुटुंबातील सदस्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. खर्चावर नियंत्रण ठेवा.

शुभ उपाय- सकाळी देवाची पूजा करू धूप जाळा व देवासमोर दिवा लावा.

शुभ दान- पांढऱ्या रंगाची वस्तू अथवा वस्त्र दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- लाल

मीन (Pisces Horoscope Today): आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असेल. जे चिंताल तसे होईल. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्या. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. जुने मित्र अथवा संपर्कात नसलेल्या नातेवाईकाशी संपर्क होण्याची शक्यता.

शुभ उपाय- सूर्याला जल अर्पण करा.

शुभ दान- ब्राह्मणास दक्षिणा दान करा

शुभ अंक- 4

शुभ रंग- पांढरा