Holi Special Mehendi Designs:  होळी सणाच्या निमित्ताने राधा-कृष्णा मेहंदीच्या स्वरूपात कशी काढाल?  (Watch Video)
Holi Mehendi Designs | Photo Credits: Youtube

Holi 2020: महाराष्ट्रासह देशभरात आज (9 मार्च) पासून होळी सणाच्या धामधुमीला सुरूवात झाली आहे. हुताशनी पौर्णिमा ते रंगपंचमी दरम्यान सुमारे 5 दिवस होलिका दहन, धुळवड आणि रंगपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. नववधूंसाठी लग्नांनंतर येणारे पहिले सण खास असतात. या वर्षी तुमचा देखील होळीचा सण हा लग्नानंतर येणारा पहिला सण असेल तर तो अधिक आनंदाने द्विगुणित करण्यासाठी सज्ज व्हा. पुन्हा साजश्रृंगार करताना हातावर मेहंदी काढून या सणामध्ये सहभागी होणार असाल तर खास होळीच्या सेलिब्रेशनसाठी राधाकृष्ण यांच्या रेखीव कलाकृतींनी सजलेली काही मेहंदी डिझाईन्स नक्की ट्राय करा. वृंदावन आणि मथुरेमध्ये होळीच्या सणाची विशेष धूम असते. पौराणिक कथांमध्ये भगवान श्रीकृष्ण राधा आणि गोपिकांसह होळी खेळत असे अशी माहिती मिळते. मग त्याच राधा कृष्णाच्या प्रतिकात्मक लीला हातावर रचून हा सण सेलिब्रेट करणार असाल तर त्यासाठी या खास मेहंदी डिझाईन्स.  Wedding Special Arabic Mehndi Designs: लग्न सोहळ्यात आपल्या हाताचे सौंदर्य खुलवण्यासाठी ट्राय करा 'या' सोप्या अरेबियन मेहंदी डिझाईन्स

आज 9 मार्च दिवशी होळी आहे. उद्या 10 मार्च दिवशी धुळवडीचा सण आहे. तर 13 मार्च दिवशी रंगपंचमी खेळली जाणार आहे. मग पहा या होळी सेलिब्रेशनमध्ये कोकणात शिमगा सणानिमित्त कशी असते धूम?

होळी सेलिब्रेशन विशेष मेहंदी डिझाईन्स

होळीचं आगमन म्हणजे वसंत ऋतूची चाहुल असते. होळीनंतर वातावरणात हळूहळू बदल होण्यास सुरूवात होते. तसेच उष्णता वाढते. त्यामुळे होळीचा आनंद लूटताना तुमच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचे आहे. मग सणाच्या आनंदात बेभान होण्यपूर्वी आरोग्याच्या दृष्टीने लहानसहान गोष्टींचा नक्की विचार करा.