Wedding Special Arabic Mehndi Designs: मागील महिन्यात 12 तारखेला तुळसी विवाह पार पडला. हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी विवाहानंतर लग्नाचा मुहूर्त काढायला सुरुवात होते. सध्या सर्वत्र लग्न सराई आहे. लग्नामध्ये मेहंदीला अतिशय महत्त्व असते. हातावरील मेहंदीमुळे हातांचे सौंदर्य आणखी खुलते. सध्या फॅशन ट्रेंड असल्यामुळे बऱ्याच स्त्रिया डिझायनर ड्रेस आणि ज्वेलरीबरोबरच डिझायनर मेंदी काढतात. लग्नासाठी सर्व नातेवाईक एकत्र येत असतात. त्यामुळे या सर्वांच्या हातावर मेहंदी काढणं अनेकदा कठीण होऊन बसतं. त्यामुळे अशा वेळी काही ट्रिक्स तुमच्या कामी येऊ शकतात. अरेबियन मेहंदी डिझाईन्स यावर एक उत्तम उपाय ठरू शकतो. अरेबियन स्टाइल मेहंदी ही झटपट काढली जाणारी मेहंदी आहे. ही मेहंदी काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तसेच या मेहंदीची डिझाइन फुला-पानांची असते.
सध्या अरेबियन मेहंदी काढण्यासाठी ब्लॅक केमिकलच्या साहाय्याने आऊट लाइन काढून हिरव्या मेहंदीने शेडिंग केले जाते. तसेच तुम्ही सिल्हवर किंवा गोल्डन रंगाने डिझाइन करूनदेखील मेंहंदी अधिक आकर्षक बनवू शकता. अरेबियन मेहंदी अगदी झटपट तयार होते. अनेकदा लग्नाच्या धावपळीत महत्त्वाच्या व्यक्तीच्या हातावर मेहंदी काढायची राहून जाते. अशावेळी फक्त 5 ते 10 मिनिटांत तुम्ही अरेबियन मेहंदी काढू शकता. (हेही वाचा - झटपट मेहंदी काढण्यासाठी 'या' सोप्या पद्धती ठरतील फायदेशीर (Watch Video)
View this post on Instagram
View this post on Instagram
वरील अरेबियन मेहंदी डिझाईन्स काढून तुम्ही तुमच्या हाताचे सौंदर्य खुलवू शकतात. भारतीय संस्कृतीत हातांना मेहंदी लावल्याशिवाय कोणताही समारंभ पूर्ण होत नाही. लग्नात नववधूच्या पूर्ण हात आणि पायावर मेहंदी काढली जाते. तसेच नववधू व्यतिरिक्त इतर नातेवाईक, मैत्रिणीदेखील आकर्षक मेहंदी डिझाईन्स काढून आपल्या हाताचे सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करत असतात.