जागतिक डास दिन (World Mosquito Day 2021) आज (20 ऑगस्ट) साजरा केला जात आहे. ब्रिटीश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस (Sir Ronald Ross) यांनी 1897 मध्ये शोधून काढले की, मादी डास (Mosquitoes) माणसांमध्ये मलेरीया पसरवतात. रॉस यांच्या संशोधनानंतर थोड्याच दिवसात स्पष्ट करण्यात आले की रॉस यांनी केलेल्या संशोधनाचे स्मरण म्हणून 20 ऑगस्ट हा दिवस जागतिक डास दिन म्हणून साजरा करावा. लंडन येथील Hygiene & Tropical Medicine School दरवर्षी डास दिन साजरा करतात. आजच्या डास दिन निमित्त जाणून घ्या, विविध आजारांचे निमंत्रण (Disease Outbreak) कसे टाळाल.
डासांमुळे होणारे आजार
एका अभ्यासात पुढे आले आहे की, विविध आजारांचे कारण हे डास आहेत. डास चावल्याने डेंग्यू ,मलेरिया / हिवताप, चिकनगुनिया,जपानी ताप / जपानी मेंदूज्वर, यांसारखे आजार होतात. त्यामुळे डासांची पैदास थांबली की डासांमुळे होणाऱ्या आजारालाही आपोआपच आळा बसतो.
डासांची उत्पती
विविध आजारांचा मूळ स्त्रोत असलेला डास हा नेहमी स्वच्छ पाण्यांवरच पैदा होतो. डास हा विविध ठिकाणी साचलेल्या स्वच्छ पाण्यांवर अंडी घालतो. ही अंडी प्रामुख्याने पाण्याच्या टाक्या, कारंजे, कूलिंग टॉवर, विहिरी, पाण्याचे हौद, इमारत बांधकामाच्या ठिकाणी साचलेले पाणी आदी ठिकाणी डासांची उत्पती होते. (हेही वाचा, या '5' प्रकारात मोडणा-या लोकांना डास जास्त चावतात, जाणून घ्या कारणे)
डासांच्या उत्पत्तीचे इतर स्त्रोत
फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, टायर्स, नारळाच्या करवंट्या, घरावर टाकलेले प्लास्टिक, मनी प्लांट - बांबू , पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, पाण्याचे पिंप, आदी ठिकाणीही डासांची पैदास होते. हे सर्व स्त्रोत हे खरेतर नेहमीच दुर्लक्षीत असतात. त्यामुळे त्याच संधीचा फायदा उठवत डास अंडी घालण्यास सुरुवात करतात. डासांचे प्रजोत्पादन वाढले की, मग विविध आजारांना निमंत्रण मिळालेच म्हणून समजा. (हेही वाचा, युगांडा: असा सोडतो वास, पटकण मरतो डास; पादणाऱ्या व्यक्तीशी कंपनीने केला करार, होणार संशोधन)
ट्विट
२० ऑगस्ट : जागतिक डास दिन !
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक खात्याने डेंग्यू आणि मलेरिया वाहक डासांच्या ४७,४०३ उत्पत्तीस्थानांसह २,९३,०२५ संभाव्य उत्पत्तीस्थळेही केली नष्ट !
घरात किंवा जवळपास कुठेही उघड्यावर साचलेले पाणी असणार नाही, याची घ्या काळजी! #WorldMosquitoDay pic.twitter.com/1sGt9gRCcq
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 19, 2021
आजारांचे निमंत्रण टाळण्यासाठी
विविध आजारांचे निमंत्रण जर टाळायचे असेल तर नेहमी सतर्क राहायला हवे. घरातील शभेच्या वस्तूंमध्ये असलेले पाणी, रिकामे पिंप, घरातील गॅलरी, प्लॅस्टीक, घराच्या आजूबाजूच्या परिसरात पडलेल्या नारळाच्या करवंट्या, टायर्स अधवा पाणी साचण्यास कारण ठरणाऱ्या वस्तू वा डबकी नष्ट अथवा रिकामी करा. अथवा निर्जंतूकीकरण करुन तिथे डास पोहोचणार नाहीत याची काळजी घ्या. घरात कोणत्याही भांड्यात असलेले पाणी पाच ते सात दिवसांपेक्षा अधिक काळ साचणार नाही याचीही काळजी घ्या. आठवड्यातील कोणत्याही एका दिवशी घरातील भांडी स्वच्छ आणि कोरडी करुन ठेवा. घराची साफसफाई करा. या गोष्टी केल्याने डासांपासून होणाऱ्या आजारांचे निमित्रण टाळता येऊ शकते.