प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

थंडीचे दिवस सुरु होण्यासह अनेक प्राकृतिक बदलाव झाल्याचे दिसून येतात. प्राकृतिक बदलावांमुळे त्याचा परिणाम व्यक्तीवर सुद्धा होते. खासकरुन मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आरोग्याची परिपूर्ण काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे वारंवार डॉक्टरांकडून सांगितले जाते. तर आज 14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिवस सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. मधुमेह असा एक आजार आहे जो वेगाने सध्या वाढत आहे. या आजारात भारत हा दुसऱ्या क्रमांवर आहे. मधुमेह हा एक गंभीर आजार असून त्याकडे दुर्लक्ष केल्यास मानवी शरीराला त्याचा फार त्रास होतो.

मधुमेह या आजाराचे 3 प्रकार आहेत. त्यामधील मधुमेह प्रकार 1, मधुमेह प्रकार 2 आणि मधुमेह प्रकार 3 सी. मधुमेह झाल्यास व्यक्तीला कमकुवतपणा जाणवू लागतो. त्याचसोबत व्यक्तीची पुरेशी झोप पूर्ण होत नाही. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी सारखेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणे फार महत्वाचे आहे. खाण्यापिण्यावर योग्य नियंत्रण ठेवून सुद्धा शरारीतील साखरेचे प्रमाण संतुलित राखता येते. तर जाणून घ्या कोणत्या गोष्टी खाल्ल्याने मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होईल.

1) डाळिंब

डाळिंबमध्ये भरपूर प्रमाणात अॅन्टीऑक्सीडेंट्स असतात. ते शरीराला फ्री रेडिकल्स होण्यापासून बचावतात आणि त्याचसोबत शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेह काही प्रमाणात नियंत्रणात राहण्यास उपयोग होतो.

2)पेरु

पेरुमध्ये फायबर असल्याच्या कारणामुळे मधुमेहात होणारी कब्जचा आजार दुर करतो. त्यातसोबत मधुमेह प्रकार 2 चा धोका सुद्धा कमी होण्यास मदत होते. एवढेच नाही तर पेरु मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ए आणि विटामिन सी असते.

3)दही

मलाई शिवाय बनवण्यात आलेले दही मधुमेह रुग्णांसाठी फार गुणकारी ठरते. हे रोज खाल्ल्यास कॉलेस्ट्रॉल आणि ट्राईग्लिसेराइड स्तरावर नियंत्रण कायम राहते. योग्य प्रमाणात दही खाल्ल्यास प्रकार 2 मधील साखरेचा धोका कमी होतो.

4)आवळा

आवळ्यामध्ये क्रोमियम असते. त्याचसोबत अॅन्टी डायबिटिक तत्व सुद्धा असल्याने ते मधुमेह आजाराच्या विरोधात लढण्यासाठी मदत करतात.

5)पपई

पपई हे मधुमेहासाठी फार गुणकारी ठरते. कारण यामध्ये नॅच्युरल अॅन्टीऑक्सिडेंट्स असतात. पपई शरीरात असलेल्या सेल्सला धोका पोहचण्यापासून बचाव करतात.

(World Diabetes Day 2019: ब्रेकफास्ट टाळणं ते मासे न खाणं या '5' सवयी ठरू शकतात मधुमेहाची कारणं)

तर वरील काही गोष्टी खाल्लाास मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होतेच. त्याचसोबत मधुमेह असलेल्या रुग्णांनी स्वत:ची काळजी घेणे हा सुद्धा तितकाच महत्वाचा भाग असून साखरेचे प्रमाण नियंत्रित कसे राहील याकडे सुद्धा लक्ष देणे महत्वाचे आहे. त्याचसोबत मधुमेह संबंधित काही बाब असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचे निवारण करावे.