थंडीच्या दिवसात भरपूर गाजर खा, आरोग्यासह सौंदर्यासाठी सुद्धा ठरेल फायेशीर

गाजर हे आरोग्यासाठी फार लाभदायी मानले जाते. खासकरुन थंडीच्या दिवसात गाजर खाल्ल्याचे भरपूर फायदे होतात. आरोग्य उत्तम राहण्यासाठी नेहमीच आहारात गाजर असावा असे तज्ञांकडून सांगितले जाते. कारण गाजर मध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन बी-8, अॅसिड, फोलेट, पोटॅशिअम, लोह, तांबे आणि मॅग्निज सारखे अन्य मिनिरल्स आणि विटामिन्स भरपूर प्रमाणात असतात. ही सर्व पोषक तत्व आरोग्यासह सौंदर्य खुलवण्यासाठी फार उपयोगी ठरतात.

ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी गाजर खाणे फायदेशीर ठरणार आहे. गाजर बीटा-कॅरेटीन, अल्फा-कॅरेटीन आणि लुटेइन संपन्न आहे. गाजर मध्ये असणारे पोटॅशिअम रक्त वाहिन्या आणि धमन्यांमध्ये पसरत जाऊन रक्त पुरवठा सुरळीत करण्याचे काम करतो. त्यामुळे हृदयाच्या कार्यप्रणालीवर सुद्धा कमी ताण पडतो. तर अॅन्टीऑक्सिडेंट आणि विटामिन ए चा गाजर मध्ये उत्तम स्रोत असल्याने त्वजा उजळण्यास मदत होते. गाजर हे सूर्याची हानिकारक अल्ट्रावॉइलेट किरणांपासून त्वचेचे रक्षण करतो.गाजर हा ओरल हेल्थसाठी सुद्धा खुप फायदेशीर मानला जातो. कारण गाजर चावून खाल्ल्यास आपल्या दातामध्ये अडकलेले अन्नपदार्थ बाहेर निघण्यास मदत होते. त्याचसोबत गाजर वारंवार चावल्यामुळे तोंडातील थुंकीचे प्रमाण वाढते. (Winter Food Tips: थंडीत पपईचे अतिसेवन केल्यास होऊ शकतात हे '5' आजार)

थंडीच्या दिवसात भरपूर गाजर खा, आरोग्यासह सौंदर्यासाठी सुद्धा ठरेल फायदेशीर Watch Video 

त्याचसोबत गाजर डोळ्यांसाठी फार उत्तम मानले जातात. यामध्ये डोळ्यांसाठी उपयुक्त ठरणारे बीटी कॅरेटीन मोतीबिंदूच्या आजारांपासून दूर ठेवतात. तसेच ल्युटिन आणि जॅक्सेंथिन तत्व असून ते सुद्धा आरोग्य आणि डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. परंतु गाजराचे अतिप्रमाणात सेवन करणे सुद्धा आरोग्यासाठी धोकायदक ठरु शकते.हॉवर्ड या विद्यापीठाच्या वैज्ञानिकांच्या मते शोध केल्यानुसार, ज्या व्यक्ती नियमित गाजराचे सेवन करतात त्यांच्यामध्ये 68 टक्के  स्ट्रोकची समस्या कमी उद्भवते. तसेच दरदिवसा एक गाजर खाल्ल्यास 68 टक्क्यांपर्यंत हृदयविकाराच्या आजारापासून आपण दूर होतो.