प्रदुषणामुळे त्वचेवर परिणाम होऊ नये म्हणून 'या' पद्धतीने घ्या खबरदारी
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

प्रदुषणामुळे सर्वात जास्त त्वचेवर परिणाम होतो. खासकरुन प्रदुषणातील कण चेहऱ्यावर जमा होतात. त्यामुले चेहऱ्यावर पुळ्या किंवा सुरकुत्या आल्याचे दिसून येते. मात्र महिलांमध्ये चेहऱ्याची काळजी घेतली जात असली तरीही प्रदुषामुळे त्याचा थोडातरी परिणाम होतोच. परंतु सध्या महिला चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी त्यावर स्कार्फ बांधताना दिसून येतात. जेणेकरुन प्रदुषणामुळे चेहऱ्याचा बचाव करता येईल.तर काहीजणी ब्युटीपार्लर मध्ये जाऊन आपले सौंदर्य अधिक खुलून दिसावे यासाठी विविध पर्यायांचा उपाय करतात. मात्र कालांतराने पार्लरमध्ये जाऊन केलेल्या चेहऱ्यासंबंधितच्या अन्य गोष्टींचे परिणाम दिसून येतात. त्यामुळे जर तुम्हाला प्रदुषणापासून चेहऱ्याचा बचाव करायचा असल्यास 'ही' खबरदारी जरुर घ्या.

>>उन्हातून जाण्यापूर्वी चेहऱ्यावर स्कार्फ बांधा

बाहेर जाताना चेहऱ्यावर स्कार्फ बांधल्याने प्रदुषणाचा थेट परिणाम चेहऱ्यावर होत नाही. तसेच चेहऱ्याला स्पेक्ट्रम सनस्क्रिन तुम्ही लावू शकता. प्रदुषणातील धुलीकण हे त्वचेसाठी फारच धोकादायक असतात.

>>फेशियल मास्क

घराच्या बाहेर पडताना प्रदुषणाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे प्रदुषणापासून बचाव करण्यासाठी सल्फर बेस्ड मास्क वापरुन पहा.

>>डेड स्किन सेल हटवा

चेहऱ्यावरुन डेड स्किन सेल हटवल्याने तुम्हाला चेहऱ्यामध्ये एक वेगळी चमक दिसून येईल. तसेच सॉफ्ट आणि ब्राइट लूक हवा असल्यास इंटेसिव फेशियल तुम्ही करु शकता.

>>चेहऱ्यावर बर्फ लावा

चेहऱ्यावर बर्फ लावल्याने ताजेतवाजे वाटते. तसेच स्किन हेल्दी सुद्धा होते.

>>कडुलिंबाची पाने

कडुलिंबाची पाने, तुळस आणि चंदनाची पावडर यांची पूड करुन एक पेस्ट तयार करा. ही तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर 15 मिनिटे ठेऊन झाल्यावर थंड पाण्याचे चेहरा साफ करा.

(Health Tips: थंडीत त्वचा कोरडी पडत असल्यास मदत करतील हे '5' झटपट उपाय)

तसेच वरील उपायांनी तुम्ही चेहऱ्याची काळजी घेऊ शकता. त्याचसोबत तुम्ही दिवसभर जर घराबाहेर उन्हातून फिरत असल्यात कमीत कमी 3-4 वेळा चेहरा पाण्याने धुवा. कारण तसे न केल्यास प्रदुषणातील धुलीकण चेहऱ्यावर बसून तो कोरडा होतो. तर घरी आल्यावरही झोपण्यापूर्वी चेहरा पाण्याने धुतल्यास त्यावरील चाललेली धुळ साफ होण्यास मदत होईल.