प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

लठ्ठपणा कोणालाच आवडत नाही. मात्र लग्नापूर्वी स्लिम आणि फिट असणाऱ्या बहुतांश महिला किंवा पुरुष मंडळी लग्नानंतर जाडे होत असल्याचे दिसून येते. खासकरुन महिलांचा लठ्ठपणामध्ये जास्त प्रमाणात समावेश असतो.

तर लग्नापूर्वी स्लिम आणि फिट राहणाऱ्या महिला लग्नानंतर लठ्ठ दिसून आल्यास त्यासाठी विविध उपाय केले जातात. मात्र अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे शरीरातील लठ्ठपणा वाढण्यास मदत होते.

-लग्नानंतर पती-पत्नीच्या लाईफस्टाईल मध्ये बदलाव दिसून येतो. त्यामुळे काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्याकडे लक्ष देणे विसरून जातात. मात्र आरोग्याकडे योग्य लक्ष दिल्यास लठ्ठपणा कमी प्रमाणात दिसून येतो.

-तर जास्तकरुन लग्न झालेले दांपत्य जेवण करण्यासाठी बाहेरच जाणे पसंद करतात. त्यामुळे एकमेकांच्या पसंती नापसंदीचा विचार केला जातो. परंतु या सर्व गोष्टींमुळे आरोग्यावर परिणाम दिसून येतो.

-लग्नानंतर बायको नवऱ्याला खुश ठेवण्यासाठी बहुतांश वेळेस लज्जतदार जेवण बनवते. तर रोज विविध प्रकारचे तेलकट पदार्थ बनवल्याने वजन वाढण्याची शक्यता फार असते.

(पावसाळ्यात या '5' नैसर्गिक पदार्थांनी वाढवा तुमची इम्युनिटी!)

परंतु विवाहित जोडपे असा विचार करतात की लग्न झाले आहे तर कोणीही आपल्याकडे बघणार नाही. त्यामुळे कसेही पदार्थ खाल्ले किंवा आरोग्याच्या गोष्टींकडे लक्ष न दिल्यास शरीरात लठ्ठपणा वाढण्यास मदत होते. त्यामुळे वरील गोष्टी नीट लक्षात ठेवा.