Breakup & Success Story:'लठ्ठ बॉयफ्रेंड नको गं बाई' म्हणत Girlfriend ने केले ब्रेकअप; इरेला पेटलेल्या तरुणाने घेतले मनावर, बनला अनेकींचा क्रश

केवळ लठ्ठपणामुळे एका तरुणाचा ब्रेकअप (Breakup) झाला. त्याला त्याची गर्लफ्रेंड (Girlfriend सोडून गेली. झाले. घडली गोष्ट बिच्चाऱ्या त्या तरुणाच्या मानाला खोलवर लागली. त्याने तो खचून गेला. पण, पुरता खचला नाही. पुन्हा त्याच उर्मीने उभा राहिला आणि त्याने मनावर घेतले. नाही. आता लठ्ठ नाही राहायचे. काय घडले पुढे? घ्या जाणून.

Breakup & Success Story:'लठ्ठ बॉयफ्रेंड नको गं बाई' म्हणत Girlfriend ने केले ब्रेकअप; इरेला पेटलेल्या तरुणाने घेतले मनावर, बनला अनेकींचा क्रश
Body Transformation (Photo Credit - Instagram)

स्थुलता (Obesity) हा विद्यमान समाजातील एक चर्चेचा विषय. अनेकजण या लठ्ठपणामुळेच (Fat) चिंतेत असतात. लठ्ठपणाचे वाईट तेव्हा अधिक वाटते जेव्हा एखाद्याला एखादी गोष्ट गमवावी लागते. एका तरुणासोबत असेच घडले. केवळ लठ्ठपणामुळे एका तरुणाचा ब्रेकअप (Breakup) झाला. त्याला त्याची गर्लफ्रेंड (Girlfriend सोडून गेली. झाले. घडली गोष्ट बिच्चाऱ्या त्या तरुणाच्या मानाला खोलवर लागली. त्याने तो खचून गेला. पण, पुरता खचला नाही. पुन्हा त्याच उर्मीने उभा राहिला आणि त्याने मनावर घेतले. नाही. आता लठ्ठ नाही राहायचे. काय घडले पुढे? घ्या जाणून.

ब्रेकअप झालेल्या या लठ्ठ तरुणाबद्दल 'डेली स्टार'ने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. यात म्हटले आहे की, गर्लफ्रेंडने ब्रेकअप केल्याने हा तरुण भलताच नाराज झाला. त्याने आपले वजन कमी करण्याचे मनावर घेतले. ज्यामुळे त्याने आपले बॉडी ट्रान्सफॉर्मेशन (Body Transformation) करण्याचे ठरवले. अवघ्या काही काळात त्याने स्वत:ला असे काही बदलवले की, आता त्याची गर्लफ्रेंड नक्कीच पश्चाताप करत असेल. होय, केवळ तो लठ्ठ आहे म्हणूनच तिने त्याच्याशी ब्रेकअपर केले होते.

इन्स्टापोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by 🅿️uvi (gram_du_insta) (@npuvi96)

पूर्वीचा हा लठ्ठ तरुण आता लठ्ठ राहिला नाही. सोशल मीडियावर अनेकांसाठी तो प्रेरणास्थान बनला आहे. त्याने स्वत:च्या शरीरावर इतके काम केले आहे की, प्रत्येक फीचर उठून दिसत आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर तो एक ऑनलाइन स्टार बनला आहे. ब्रेकअप झाल्यावर त्याने जीममध्ये जाऊन स्वत:वर मेहनत केली आणि सुडौल असे पीळदार शरीरयष्टी कमावली. (हेही वाचा, Body Transformation: ही कसली फॅंटसी? बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करुन झाला 'Black alien'; संपूर्ण अंगावर गोंदवले टॅटू (पाहा फोटो))

इन्स्टापोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by 🅿️uvi (gram_du_insta) (@npuvi96)

पुवी, असे या युवकाचे नाव आहे. आगोदर तो तब्बल 139 किलो वजनाचा होता. मात्र, मोठ्या मेहनतीने त्याने आपल्या शरीरावर व्यायाम करुन नियंत्रण मिळवले. आता तो अनेकांना प्रेरणा देतो. तो एक टीकटॉक स्टारही आहे. तो सातत्याने आपली खास छायाचित्रे, व्हिडिओ इन्स्टा, फेसबुक आणि ट्विटरवर शेअर करत असतो.

(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2022 04:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).