Anthony Loffredo, Black Alien | (Photo Credits: Instagram)

आपल्या सौंदर्य आणि इतरही बऱ्याच गोष्टांबाबत विविध विचार, संकल्पना ठेवणारे लोक आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्तीसुद्धा. त्यामुळे फॅन्टसीला काही सीमा नाही. अशीच एका व्यक्तिची विचित्र फॅन्टसी (Fantasy) पुढे आली आहेत. हा व्यक्ती आपली बॉडी ट्रांसफॉर्मेशन (Body Transformation) करत चक्क ब्लॅक एलियन (Black Alien) झाला आहे. इतकेच नव्हे तर त्याने आपल्या संपूर्ण अंगावर टॅटू गोंदवला आहे. फ्रान्समधील एंथनी लोफ्रेडो (Anthony Loffredo) या व्यक्तिला टॅटूचे इतके वेड आहे की आता तो आपली ओळखच बदलून बसला आहे. आता त्याला कोणही ओळखू शकत नाही. त्याने आपल्या शरीरावरही चित्रविचीत्र बदल केले आहेत. इतके की त्याने आपल्या डोळ्यांच्या बाहुल्यांवरही टॅटू गोंदवला आहे.

फ्रान्समध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय एंथनी लोफ्रेडो (Anthony Loffredo) याला सोशल मीडियावर ब्लॅक एलियन (Black Alien) नावाने ओळखतात.त्याने स्पेनमध्ये आपले नाक शस्त्रक्रिया करुन हटवले. हे उपोद्याप करण्यासाठी तो स्पेनला गेला कारण असे करणे फ्रान्समध्ये बेकायदेशीर मानले जाते.

इन्स्टाग्रामवर एंथनी याचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. एंथनीने आपल्या इंन्स्टाग्राम सेशलदरम्यान हेही सांगितले होते की, तो आपल्या शरीरावरची त्वचा हटवून त्या ठिकाणी संपूर्णपणे धातू लावू इच्छितो. तसेच, नाक हटवल्यानंतर तो आता आपले ओठ पाय आणि हात, त्यावरील बोटांवरही काही बदल करु इच्छितो. (हेही वाचा, Aurangabad Man Swallows Toothbrush: तरुणाने गिळला टूथब्रश, घाटी रुग्णालयात शस्त्रक्रिया करुन काढला बाहेर)

फ्रेंच वृत्तपत्र मीडी लिब्रेने काही दिवसांपूर्वी वृत्त दिले होते की, एंथनी लोफ्रेडो (Anthony Loffredo) हा बालपणापासूनच आपल्या शरीराबाबत आणि त्याचे ट्रांसफॉर्मेशन करण्याबाबत पॅशिनेट राहीला आहे.

हा इसम सुरुवातीला सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. तेव्हा त्याला ध्यानात आले की आपण आपल्याला हवे तसे आपले आयुष्य जगत नाही आहोत. मग त्याने वयाच्या 24 व्या वर्षी ऑस्ट्रेलियाला गेला. तेथे जाऊन त्याने आपल्या शरीरावर मोठे बदल केले. त्याने सांगितले की, तो प्रत्येक वेळी आपल्या बॉडी ट्रान्सफर्मेशनबाबतच विचार करतो. आता ही त्याच्यासाठी एक सर्वसामान्य गोष्ट आहे.