SpiceJet launches Ventilator SpiceOxy | (Photo Credits: Twitter/SpiceJet )

विमान कंपनी स्पाइसजेट (SpiceJet) आता नव्या उद्योगात उतरली आहे. स्पाइसजेट कंपनीने आता वैद्यकीय उपकरण उद्योगात प्रवेश केला आहे. या कंपनीने सोमवारी एक पोर्टेबल व्हेंटीलेटर (SpiceJet Ventilator) लॉन्च केला. 'स्पाइसऑक्सी' (SpiceOxy) असे या व्हेंटीलेटरचे नाव आहे. 'स्पाइसऑक्सी' (Ventilator SpiceOxy) हा एक कॉम्पॅक्ट, पोर्टेबल, नॉन-इनवेसिव व्हेंटिलेशन डिवाइस आहे. जो रुग्णाच्या हलका ते मध्यम स्वरुपात श्वसनास मदत करण्यसाठी कामी येतो.

स्पाइसजेट ही प्रामुख्याने विमान कंपनी म्हणून ओळखली जाते. मात्री ही कंपनी इतर उद्योग व्यवसायातही कार्यरत आहे. या आधी या कंपनीने फॅशन रिटेल, मर्चेंडाइज आणि ई-कॉमर्स, फ्रेट मूवमेंट, फ्रेश फार्म प्रोडक्ट आदी व्यवसायात प्रवेश केला आहे. त्यासोबतच ही कंपनी आता वैद्यकीय उपकरण उद्योगात प्रवेश करत आहे. (हेही वाचा, SkyDrive Flying Car: जपानी कंपनी निर्मित हवेत उडणाऱ्या गाडीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण (Watch Video))

स्पाइसजेटचे चेअरमन अजय सिंह यांनी म्हटले आहे की, स्पाइसजेटसाठी आज एक मोठा दिवस आहे. आम्ही आत्मनिर्भर भारत निर्माणासाठी आम्ही एक भक्कम पाऊल टाकत आहोत. त्यातूनच स्पाइसऑक्सी आणि पल्स ऑक्सीमीटर आम्ही लॉन्च केले आहेत. जी मेड इन इंडिया आहे.

स्पाइसऑक्सी निर्मितीचा उद्देश ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया (ओएसए) या रेस्पिरेटरी समस्येचा सामना करत असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी नॉन-इंवेसिव वेंटिलेटर प्रभावी ठरेल. हे उपकरण टरबाईन अधारीत आहे. हे वजनालाही हलके आहे. त्यामुळे हे वापरासाठी आणि हाताळण्यासाठी सोपे असणार आहे.