गाढ झोप घेतल्यास 30 टक्के तणाव होईल दूर - संशोधन
गाढ झोपेची गरज (Photo Credits Unsplash)

सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे मानसिक तणाव वाढत आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिवर्सिटीने (University of California) केलेल्या अभ्यासानुसार, गाढ झोप घेतल्यामुळे ३० टक्के तणाव दूर होतो, असा दावा करण्यात आला आहे. या संशोधनामध्ये झोप न लागण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागत असल्याचे समोर आले आहे. यात भारत पहिल्या तर चीन दुसऱ्या क्रमाकांवर आहे. अपुरी झोप झाल्यामुळे लोकांचा स्वभाव चिडचिडा होतो त्याचा परिणाम दिवभरातील कामांवर होतो. तसेच केवळ झोप घेणं नव्हे तर गाढ झोप घेतल्याने तणाव दूर होतो, असंही या रिसर्चमध्ये म्हटलं आहे. (हेही वाचा - हिवाळ्यात शरीरासाठी उपयुक्त ठरेल आलं-लसणाचं लोणचं, जाणून घ्या हे महत्त्वाचे फायदे)

सध्या सर्वत्र धावपळीचं वातावरण आहे. त्यामुळे कोणालाही पुरेशी झोप मिळणं कठीण झालं आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, आदींचा अतिरिक्त वापर करत आहेत. त्यामुळे या सर्वाचा परिणाम झोपवर झाला आहे. केवळ ६ तास झोप घेणं गरजेचं नसून गाढ झोप घेणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

हेही वाचा - सावधान! आल्याचा चहा पिण्याचे ‘हे’ 5 तोटे तुम्हाला माहित आहेत का ?

कामाच्या टेन्शनमुळे तुमचा मेंदू थकतो. त्यामुळे तुम्हाला गाढ झोपेची गरज असते. गाढ झोप घेतल्याने ३० टक्के तणाव कमी होतो. तसेच तुम्ही जेव्हा गाढ झोपलेला असता तेव्हा तुमचा मेंदू विचार करायचे थांबतो. त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो. याचा परिणाम मनावरही होत असतो. असं केल्याने तुम्ही नकारात्मकतेकडून सकारात्मक विचारांकडे आकर्षित होता. त्यामुळे तुमचे मन आणि चेहरा प्रसन्न राहातो. भारतातील लोक खूप कमी वेळ झोपतात. तर देशातील जवळ-जवळ १० कोटी लोक निद्रानाशाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे पुरेशी झोप न झाल्याने आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो.