Smartphone and Sex Life: तुम्ही देखील खिशात स्मार्टफोन ठेवत असाल तर व्हा सावध, येऊ शकते नपुंसकत्व, जाणून घ्या सविस्तर
प्रतीकात्मक फोटो (File Image)

आजकाल स्मार्टफोनचा (Smartphone) वापर प्रचंड वाढला आहे. डिजिटल इंडियाच्या बूममुळे देशातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचा स्मार्टफोन आहे. तर जर का तुम्ही तुमचा स्मार्टफोन शर्ट अथवा पॅंटच्या खिशात ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकेल. बरेच लोक त्यांच्या शर्टच्या खिशात स्मार्टफोन ठेवतात, तर काही लोक त्यांच्या पॅंटच्या समोरच्या दोन खिशांपैकी एकात फोन ठेवतात. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे शरीराला मोठी हानी पोहोचू शकते.

शर्टच्या खिशात स्मार्टफोन ठेवल्याने हृदयविकार होऊ शकतो, तर पँटच्या खिशात ठेवल्याने प्रायव्हेट पार्ट्सच्या समस्या उद्भवू शकतात.

स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. लोक त्यांचा फोन नेहमी सोबत ठेवतात. अनेक लोक अगदी बाथरूममध्येही फोन घेऊन जातात. घरी असतानाही लोक फोन त्यांच्या खिशात ठेवतात, पण त्यामुळे मोठा आजार होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, फोन खिशात ठेवून वायरलेस नेटवर्कला जोडल्यास शरीराला 10 पट रेडिएशनला सामोरे जावे लागते. रेडिएशन हे देखील कर्करोगाचे कारण मानले जाते. (हेही वाचा: फक्त उत्स्फूर्त सेक्सच सर्वात कामुक आणि समाधानकारक असू शकत नाही; लैंगिक संबंधाच्या नवीन अभ्यासात खुलासा)

रिपोर्टनुसार, रेडिएशन तुमची डीएनए रचना देखील बदलू शकते. त्यामुळे तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम होऊ शकते. या रेडिएशनमुळे नपुंसकत्व आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. फोन खिशात ठेवल्याने हाडेदेखील कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे शरीराच्या नाजूक अथवा संवेदनशील भागाजवळ तुमचा फोन ठेवू नका. फोन एक तर बॅग किंवा पर्समध्ये ठेवणे चांगले. जर तो बॅगमध्ये ठेवायचा नसेल तर फोन मागच्या खिशात ठेवू शकता. रेडिएशन एक्सपोजर कमी करण्यासाठी, स्मार्टफोन पॅंटच्या मागच्या खिशात ठेवणे कधीही चांगले.