जेवणानंतर लगेच झोपल्याने वाढू शकते वजन, 'या' गोष्टींचे पालन करा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

लोकांना जेवल्यानंतर झोप येण्यास सुरुवात होते. त्यामुळे आळसपणा अंगाशी येऊन जेवल्यावर झोपावेसे वाटते. परंतु जेवणानंतर लगेच झोपणे आरोग्यासाठी परिणामकारक ठरु शकते. तसेच जेवणानंतर झोपल्याने पचनक्रिया व्यवस्थित न झाल्याने वजन वाढण्यास मदत होण्याची शक्यता असते.

जर तुम्हीसुद्धा जेवल्यानंतर लगेच झोपत असाल तर वेळीच सावध व्हा आणि या गोष्टींचे दैनंदिन पालन करा.

1. शरीरात चरबी वाढण्यास मदत

नेहमी जेवल्यानंतर लगेच झोपणे अयोग्य आहे. तर जेवल्यानंतर थोडा वेळाचे अंतर ठेवून झोपल्यास उत्तम. परंतु जेवणानंतर लगेच झोपल्यास शरीरात चरबी वाढण्यास मदत होते.

2. गॅस आणि इंन्फेक्शन होण्याची शक्यता

खाल्लेले अन्न पचण्यासाठी काही वेळ लागतो. त्यामुळे खाल्ल्यानंतर काही वेळ थांबून झोपावे. असे न केल्यास पोटात गॅस आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.

3. कोमट गरम पाणी प्या

जेवणात तळलेल्या पदार्थांचा समावेश असो वा नसो तरीही जेवल्यानंतर कोमट गरम पाणी प्या. त्यामुळे तळलेल्या पदार्थांचे प्रमाण कमी होऊन शरीरातील चरबी ही वाढत नाही.

4. जेवल्यानंतर शतपावली करा

जेवणानंतर थोडा वेळ शतपावली केल्यास उत्तम. असे केल्याने वजन संतुलित राहते आणि शरीरातील चरबी ही वाढत नाही. परंतु जेवणानंतर व्यायाम करणे शरीरासाठी हानिकारक मानले जाते.

5. रात्री जास्त जेवण करणे टाळा

रात्रीचे जेवण हे नेहमी हलक्या पद्धतीचे किंवा कमी खाणे उत्तम असल्याचा सल्ला आपल्याला डॉक्टरांकडून दिला जातो. त्यामुळे रात्रीच्या वेळेस जास्त जेवण करणे टाळावे. अतिउच्च प्रमाणात रात्री जेवण केल्यास खाल्लेले अन्न नीट पचण्यास मदत होत नाही. त्यामुळे शरीरात अधिक कॅलरीचे प्रमाण वाढून वजन वाढण्याची शक्यता असते.