रशियन बनावटीच्या स्फुटनिक वी (Sputnik V) लसीबददल एक दिलासादायक बातमी अभ्यासामधून समोर आली आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अहवालामध्ये स्फुटनिक वी लसीचा एक डोस देखील शरीरात कोरोना वायरस विरूद्ध लढण्यासाठी सबळ अॅन्टिबॉडीज (Antibody) निर्माण करू शकत असल्याचं सांगण्यात आले आहे. यापूर्वीच्या अहवालामध्ये स्फुटनिक वी लसीमध्ये दोन अडिनोव्हायरसचा वापर केला असून ही वेक्टर व्हॅक्सिन असल्याचं सांगण्यात आले होते. या लसीचा प्रभाव देखील 92% असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अडिनो वायरस हा एक सामान्य वायरस असून तो सर्दी, खोकला, ताप, घशात खवखव अशा आजारपणांमध्ये दिसून येतो. journal Cell Reports Medicine मध्ये नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालामध्ये दोन पेक्षा एकाच डोस मध्ये कोविड 19 पासून लोकांना संरक्षण मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. COVID-19 Vaccine Update: Sputnik V च्या निर्मितीमध्ये आता Serum Institute of India देखील सहभागी; सप्टेंबर महिन्यापासून होणार सुरूवात.
Andrea Gamarnik या Fundacion Instituto Leloir-CONICET चे ज्येष्ठ लेखक यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरात सध्या लसींचा तुटवडा असल्याने आणि विषम पद्धतीमध्ये विभाजन झाल्याने अनेक आरोग्य यंत्रणांकडून व्हॅक्सिनेशन स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी डाटा मोठ्या प्रमाणात मागितला जात आहे. सध्याची ग्लोबल हेल्थ इमरजन्सी पाहता आता लोकांचे आरोग्य पाहता आता पिअररिव्ह्यू डाटा देखील उपलब्ध करून देत आहोत.
AstraZeneca ची लस सध्या एका शॉट नंतर 76% संरक्षण देत आहे. तर कोरोनाची लागण झालेल्यांना अमेरिकेची फायझर आणि मॉर्डना देखील पुरेसे संरक्षण देत असल्याचं पुढे आले आहे.
अर्जेंटीना मध्ये करण्यात आलेल्या 289 आरोग्य कर्मचार्यांवरील अभ्यासानुसार, दुसर्या डोसच्या 3 आठवड्यानंतर पूर्वी इंफेक्शन न झालेल्यांनाआता immunoglobulin G (IgG) antibodies आढळल्या आहेत. दरम्यान पूर्वी इंफेक्शन नसलेल्या आणि दोन्ही डोस घेतलेल्यांपेक्षा कोरोना झालेल्या आणि एक डोस घेतलेल्यामध्ये या (IgG) antibodies अधिक असल्याचं समोर आले आहे. दुसरा डोस अशांमध्ये काही अधिक अॅन्टिबॉडीज वाढवत नसल्याचाही दावा करण्यात आला आहे.