
Shefali Jariwala चा काही दिवसांपूर्वी अचानक मृत्यू झाल्याने आता तिच्या निधनामागील कारणांची चर्चा सुरू झाली आहे. काहींना तिच्या कार्डिएक अरेस्ट (Cardiac Arrest) मागे कोविड 19 लस (COVID Vaccine) असल्याचा अंदाज आहे. मात्र शेफाली सह अनेक कार्डिएक अरेस्टच्या निधनाच्या वृत्तांमध्ये कोविड लसीशी जोडलेला संबंध चूकीचा असल्याचं तज्ञांचं मत आहे. शेफालीच्या डॉक्टरांच्या मते, तिच्यावर anti-ageing treatment मागील 8 व र्षांपासून सुरू होती.
27 जून दिवशी शेफालीला नेहमीप्रमाणे अॅन्टी एजिंग इंजेक्शन देण्यात आले. यामध्ये Glutathione आणि Vitamin C चा समावेश होता. त्यानंतर रात्री 10 ते 11 च्या दरम्यान शेफाली आजारी पडली. अचानक बेशुद्ध पडली. तातडीने शेफालीला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले मात्र तिचा जीव वाचू शकला नाही. प्राथमिक अंदाजानुसार तिला कमी रक्तदाबाचा त्रास झाला. सोबत कार्डिएक अरेस्ट आणि gastric distress होता. अॅन्टी एजिंग औषधांचे दुष्परिणाम, ज्यात पोटफुगीचा समावेश आहे, ते देखील तपासात आले आहेत.
सोशल मीडियावर तिच्या मृत्यूचा आणि कोविड-१९ लसीकरणाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, अशा दाव्यांना समर्थन देणारे कोणतेही पुरावे नाहीत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि AIIMS च्या व्यापक अभ्यासाचा हवाला देत एक स्पष्ट विधान जारी केले आहे, ज्यामध्ये कोविड-19 लसी आणि अचानक हृदयविकाराच्या मृत्यूंमध्ये कोणताही कारणात्मक संबंध आढळला नाही.
शेफालीच्या मृत्यूचा संबंध कोविड 19 लसीशी जोडणं चूकीचं
मंत्रालयाने पुष्टी केली की भारतात वापरल्या जाणाऱ्या लसी सुरक्षित आहेत आणि गंभीर दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ आहेत. अंतिम पोस्टमॉर्टेम अहवालाची वाट पाहत आहे, परंतु कोणत्याही अधिकृत एजन्सीने तिच्या मृत्यूचा संबंध कोविड-19 लसीकरणाशी जोडलेला नाही.