भारतात सेक्स बद्दल बोलणे थोडे अवघडल्यासारखेच प्रत्येकाला वाटते. तसेच ज्या वेळी सेक्स संदर्भातील एखादी गोष्ट किंवा परिस्थिती निर्माण झाल्यास लोक त्यावर बोलण्यास टाळाटाळ करतात. ऐवढेच नाही तर सेक्स ही आपले कल्चरमधील एक भाग नसल्यासारखे सुद्धा काहीजण वागतात. परंतु एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, ऑनलाईन पद्धतीने सेक्स टॉईज खरेदी करणे आणि सेक्स बद्दलच्या त्यांच्या फॅन्ट्सी लोकांना पूर्ण करण्यास मिळत आहेत. त्यामुळे या संदर्भातील एका अभ्यासातून असे ही समोर आले आहे की, कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सेक्स टॉईजची मागणी वाढली असल्याचे दिसून 65 टक्के त्याची विक्री झाली आहे. सेक्स टॉईज बाबत शहरांनुसार डेटा सुद्धा एकत्रित करण्यात आला. त्यामधून असे समोर आले की, मुंबई यामध्ये अव्वल स्थानावर आहे. ऐकून थोडे थक्क व्हाल पण हे खरे आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सेक्स टॉईजच्या खरेदीत विविध शहारांतून वाढ झाल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. तर लॉकडाऊनमुळे घरी अडकलेल्यां कपल्ससाठी ही उत्तम संधी असून त्यांना एकमेकांसोबत वेळ सुद्धा घालवता येत आहे. तसेच त्यांच्याकडे सेक्सची संधी सुद्धा उपलब्ध झाली आहे. तर Ireland and Columbia मध्ये लॉकडाऊनच्या काळात सेक्स टॉईजची मागणी तुफान वाढल्याचे दिसून आले आहे. परंतु अन्य देश जसे भारतात सेक्स बाबत बोलणे हे लाजिरवाणे वाटते परंतु अभ्यासातून अशी माहिती समोर आल्यावर सगळ्यांच्या आता भुवया उंचावल्या आहेत.(Anal Sex Problems: गुदमैथुन करताना जोडीदारासमोर होऊ शकते तुम्ही फजिती; सेक्स करताना घ्या 'या' गोष्टींची काळजी)
Thatspersonal.com यांच्या रिपोर्ट्सनुसार, India Uncovered: Insightful Analysis of Sex Products’ Trends in India असे नाव त्याला दिले आहे. त्यानुसार सेक्स मार्केटमध्ये 65 टक्के अधिक तेजी दिसून आली आहे. हा अभ्यास जवळजवळ 22 मिलियन लोक आणि 3,35,000 प्रोडक्ट्सची ऑनलाईन पद्धतीने विक्री केल्यासंदर्भातील आहे. यामध्ये असे दिसून आले आहे की, महाराष्ट्रात सर्वाधिक सेक्स टॉयची विक्री करण्यात आली आहे. त्यानंतर कर्नाटक आणि तमिळनाडू यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. मेट्रो सिटीबाबत बोलायचे झाल्यास मुंबई यामध्ये अव्वल आहे. त्यानंतर बंगळुरु, नवी दिल्ली अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे.(Sex Toys: पहिल्यांदाच तुम्ही Dildo चा वापर करणार आहात? या सोप्प्या टीप्स लक्षात ठेवल्याने मास्टरबेशनची अधिक येईल मजा)
अभ्यासात पुढे असे ही म्हटले आहे की, सुरत येथे सर्वाधिक म्हणजेच नागरिकांकडून जवळजवळ 3900 रुपयांपर्यंत खरेदी केली जाते. उत्तर प्रदेशात सुद्धा सेक्स टॉईजची खरेदी करण्यात आल्याचे दिसून आले आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे सेक्स टॉईजची ऑनलाईन खरेदी करण्यासाठी पुरुष वर्ग हा रात्री 9 ते मध्यरात्रींचा वापर करतात. तर महिलांकडून दुपारी 12 ते 3 वाजताच्या दरम्यान याची खरेदी केली जात असल्याचे ही सांगण्यात आले आहे. यातून असे ही समोर आले आहे की प्रथमच खरेदी करणाऱ्या महिला आणि पुरुषांनी वारंवार त्याच सेक्स टॉईजची ऑनलाईन ऑर्डर केली आहे.