Fit India Movement: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 24 सप्टेंबर रोजी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman), ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांच्याशी चर्चा करणार आहेत. 24 सप्टेंबर रोजी ‘फिट इंडिया मुव्हमेंट’चा (Fit India Movement) पहिला वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी, फिट इंडिया संवाद (Fit India Dialogue 2020) हा ऑनलाईन माध्यमातून आयोजित केला जाईल. या कार्यक्रमात पीएम मोदी अशा लोकांशी चर्चा करतील ज्यांनी लोकांना फिटनेससाठी प्रेरित केले आहे. केंद्र सरकारची फिट इंडिया मुव्हमेंट ही एक महत्त्वाकांक्षी चळवळ असून, याद्वारे लोकांमध्ये फिटनेसचे महत्त्व वाढविले जात आहे.
फिट इंडिया मुव्हमेंटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित देश-व्यापी ऑनलाईन ‘फिट इंडिया संवाद’दरम्यान पंतप्रधान मोदी फिटनेस इंफ्लुएन्सर आणि नागरिकांशी संवाद साधतील. माध्यमांना देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, ऑनलाइन संभाषणात सामील असलेले लोक फिटनेस आणि चांगल्या आरोग्याविषयी सांगतील. यांच्या विचारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःचे मार्गदर्शन करतील. यावेळी, लोक त्यांच्या फिटनेस जर्नीबद्दल सांगत काही टिप्स देखील देतील. या चर्चेत ज्या लोकांचा समावेश असेल त्यामध्ये विराट कोहली, मिलिंद सोमण, रुजुता दिवेकरसह इतर अनेकांचा समावेश असेल.
असे सांगितले जात आहे, या फिटनेस संवादात पोषण, आरोग्य आणि फिटनेसची चर्चा केली जाईल. असे सांगण्यात आले आहे की, फिट इंडिया मुव्हमेंटची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनआंदोलन म्हणून केली होती. फिट इंडिया मुव्हमेंटची कल्पना भारतातील लोकांसाठी ‘फिट देश’ बनविण्यासाठी अंमलात आणली जात आहे. सध्याच्या कोरोना व्हायरसच्या काळात तर फिटनेस अतिशय महत्वाचा आहे, म्हणूनही हा संवाद खास ठरणार आहे. (हेही वाचा: कृषिप्रधान भारतात गेल्यावर्षी किती शेतकरी आत्महत्या झाल्या? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दिले उत्तर)
दरम्यान, फिट इंडिया मुव्हमेंट ही गेल्या वर्षी सुरू झाली आहे. या दरम्यान विविध कार्यक्रमांद्वारे सर्व स्तरातील आणि देशभरातील अनेक लोक उत्साहाने सामील झाले आहेत. वर्षभरात फिट इंडिया फ्रीडम रन, प्लॉग रन, सायक्लोथन, फिट इंडिया वीक, फिट इंडिया स्कूल सर्टिफिकेट आणि इतर विविध कार्यक्रमांत साडेतीन कोटी लोकांचा सहभाग दिसून आला आहे.