COVID-19 Vaccine Update: Oxford-AstraZeneca च्या कोविड-19 वरील लसीच्या ट्रायल्सला युके मध्ये पुन्हा सुरुवात
Coronavirus Vaccine Representational Image (Photo Credits: ANI)

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) आणि अ‍ॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) च्या कोविड-19 (Covid-19) वरील लसीच्या क्लिनिकल ट्रायलला (Clinical Trials) युके (UK) मध्ये पुन्हा सुरुवात झाली आहे. लस दिलेली महिला  आजारी पडल्याने युके मध्ये या लसीची मानवी चाचणी थांबवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा लसीच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवार, 8 सप्टेंबर च्या रात्री कंपनीकडून लसीच्या चाचण्या थांबण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. लस दिलेल्या महिलमध्ये काही neurological symptoms दिसून आल्याने लसीच्या चाचण्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.

दरम्यान ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका लसीच्या चाचण्यांना मिळालेल्या स्थगितीनंतरही ही लस 2020 च्या अखेरपर्यंत तयार होईल असा विश्वास अ‍ॅस्ट्राझेनेका चे सीईओ Pascal Soriot यांनी व्यक्त केला होता. (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या कोविड-19 वरील लसीच्या ट्रायल्सच्या स्थगितीनंतरही या वर्षाअखेरपर्यंत लस तयार होण्याची शक्यता)

पहा ट्विट:

भारतात सीरम इंस्टिट्युटकडून या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्स सुरु होत्या. युके मधील स्थगितीनंतर Drug Controller General of India च्या आदेशानुसार भारतातील मानवी चाचण्याही थांबण्यात आल्या. तसंच AstraZeneca जोपर्यंत ट्रायल्स सुरु करत नाहीत तोपर्यंत भारतातील लसीची मा्नवी चाचणी थांबवण्यात आली आहे, असे सीरम इंस्टिट्युट कडून सांगण्यात आले होते. त्यामुळे युके मध्ये चाचण्या सुरु झाल्याने भारतातही चाचण्या लवकरच सुरु होतील, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.

कोविड-19 चे आरोग्य संकट दिवसेंदिवस दाहक रुप धारण करु लागले आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे लसीच्या विकासाकडे सर्वांचेच लक्ष आहे. जगभरात एकूण 180 चाचण्या विकासाच्या टप्प्यात असून त्यापैकी 35 लसींच्या मानवी चाचण्या सुरु असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली आहे. दरम्यान, ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका लसीच्या चाचण्या पुन्हा सुरु झाल्याने आशादायी वातावरण निर्माण झाले आहे.