Novavax | PC: Twitter/ANI

भारतामध्ये Novavax च्या पहिल्या कोविड 19 लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मंगळवार 22 मार्च दिवशी त्याची घोषणा करण्यात आली आहे. ही कोविड 19 लस वयवर्ष 12 ते 18 मधील मुलांसाठी आहे. Novavax ने जारी केलेल्या स्टेटमेंट मध्ये ही लस NVX-CoV2373 अशी देखील ओळखली जाते असे सांगण्यात आले आहे. ही लस मॅन्युफॅक्चर आणि मार्केट भारतामध्येच केली जाणार आहे. सीरम इन्स्टिट्युट मध्ये त्याचं काम होईल. मात्र ब्रॅन्ड नेम Covovax असणार आहे.

Novavax ची ही कोविड 19 लस या वयोगटातील लोकांसाठी पहिली प्रोटिन बेस्ड आहे. Drugs Controller General of India कडून या लसीला 12 वर्षांवरील लोकांना SARS-CoV-2 विरूद्ध इम्युनायझेशनसाठी मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात आली आहे. नक्की वाचा: Novavax निर्मित Covid-19 Vaccine कोरोना व्हायरसच्या वेरिएंट्सवर 90% परिणामकारक .

Novavax कंपनीने भारतात 12-18 वयोगटातील मुलांना कोविड 19 विरुद्ध लढण्यासाठी पहिली कोविड 19 लस उपलब्ध करून दिल्याचा अभिमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याची प्रभावक्षमता आणि सुरक्षितता समाधानकारक असल्याचा त्यांनी दावा केला आहे.

DCGI ने सुरुवातीला डिसेंबरमध्ये 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांसाठी Covovax साठी आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली होती. याव्यतिरिक्त, Covovax ला जागतिक आरोग्य संघटनेकडून Emergency Use Listing देखील प्राप्त झाली आहे.