अनेकदा दैनंदिन जीवनात काही गोष्टी करण्याचे ठरवितो. मात्र त्या पूर्ण होतातच असे नाही. मात्र जर तुम्हाला दीर्घायुष्य जगायचे असेल तर या 5 गोष्टी जरुर जाणून घ्या.
1.पौष्टिक आहाराचे सेवन करा
दररोज आहारात पौष्टिक फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. जेणेकरुन त्यामधून कार्बोहायड्रेड व प्रथिनांचा शरीराला योग्य तो पुरवठा केला जाईल. तसेच जेवणासाठी योग्य ती वेळ निश्चित करुन त्याप्रमाणे आहाराचे सेवन करावे. तर दररोज 10-12 बदाम, अक्रोड या सारख्या सुकामेवाचा समावेश असावा.
2. भरपूर झोप घ्या
नियमित 7-8 तास झोप घ्यावी. तसेच ताणतणावची परिस्थिती असल्यास दिवसीतून 3-4 चार झोप घेणे आवश्यक असल्याचे तज्ञ्जांकडून सांगतिले जाते.
3. दररोज व्यायाम करावा
दीर्घायुष्य जगण्यासाठी रोज 45-60 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच व्यायामामध्ये चालणे, सायकलिंग, स्विमिंग आदी सारख्या व्यायामांच्या प्रकाराचा समावेश करावा. तर दररोज 10,000 पावले चालण्याचा प्रयत्न करावा
4. संतुलित वजन ठेवावे
माणसाच्या शरीरातील महत्वाचा घटक म्हणजे वजन. योग्य त्या प्रमाणात वजन ठेवल्यास काही आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. तर शरीरामधील BMI चे प्रमाण 18-23 ठेवावे.
5. ताणतणावापासून दूर रहावे
जीवनातील तणातणाव कमी करण्यासाठी नियमित व्यायाम आणि मेडिटेशन आवश्यक करणे.तसेच चांगल्या प्रकारची गाणी ऐकावी व स्वत:साठी दिवसातील काही वेळ द्यावा.
तर निसर्ग नेहमीच आपल्याला भरभरून आरोग्यदान देत असतो त्यामुळे त्याचा पुरेपुर उपयोग करता येणे आवश्यक आहे.