Less Water Intake: मानवी शरीर हे 80 टक्के पाण्याने तयार झालेले आहे. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव, रक्तपेशी या सुरळीत सुरु राहण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. यामुळे दररोज पुरेशा प्रमाणात पाणी पिणे महत्वपूर्ण आहे. मेडिकल एक्सपर्ट्सचे असे म्हणणे आहे की, दररोज 6-8 ग्लास पाणी किंवा कमीत कमी 4 लीटर पाणी पिणे गरजेचे आहे.(Health Tips: नारळ पाणी पिण्यामागे 'ही' वैज्ञानिक कारणे नक्कीच ठरतील तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर)
जर तुम्ही अधिक अॅक्टिव असाल तर अधिक प्रमाणात पाणी प्या. मात्र तुम्ही असे करत नसाल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण याचा आरोग्याला मोठा धोका उद्भवू शकतो. पाणी पिण्याव्यतिरिक्त खासकरुन तुम्ही टरबूज, कलिंगड, बेरीज, लिंबू पाणी सुद्धा तुम्ही पिऊ शकता. तर जाणून घ्या कमी पाणी पिण्याने आरोग्याला कोणते मोठे नुकसान होऊ शकते. दिवसभरात तुम्ही कितीही व्यस्त असाल तरीही पाणी पिणे विसरु नका.
जेव्हा आपल्या शरिरात पाण्याची कमतरता भासू लागल्यास तुम्हाला प्रथम डोके दुखण्याची समस्या उद्भवू शकते. मात्र अशावेळी तुम्ही पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास थोड्यावेळाने हा त्रास दूर होऊ शकतो. त्याचसोबत शरिरातील पाण्याची कमतरता ही तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येऊ शकते. तुमची त्वचा कोरडी, थकलेली ही दिसते. यामुळे तुम्हालाच तुमची काळजी घेणे आवश्यक आहे.(Exercise With Empty Stomach: उपाशी पोटी व्यायाम करणे योग्य की अयोग्य?)
या व्यतिरिक्त शरिराच्या उर्जेसाठी पुरेश्या अन्नासोबत पाण्याची ही गरज भासते. मात्र याचे प्रमाण कमी असल्यास तुम्ही सुस्त आणि गोंधळलेले दिसून येतात. यासाठी तुम्हाला जेव्हा कधी तहान लागेल तेव्हा चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी पाणी किंवा नारळ पाणी प्या. काही वेळेस लोक भुक लागली की पाणी पिण्याऐवजी आपण काहीतरी खातो. मात्र अशावेळी तुम्ही पाणी पिऊन बघा. जेणेकरुन तुमची भुक भागल्यासारखे वाटेल.