Exercise With Empty Stomach: उपाशी पोटी व्यायाम करणे योग्य की अयोग्य?
Workout (Photo Credits-Pixabay)

Exercise With Empty Stomach: जिममध्ये वर्कआउट करताना खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. वर्कआउ करणारे लोक वर्कआउट पूर्वी किंवा त्यानंतर खाणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला माहितीच असेल की, योग्य वेळी योग्य आहार घेतल्यास तुम्हाला वर्कआउट केल्याचा सुद्धा रिजल्ट मिळेल. प्रोफेशनली असे म्हटले जाते की, कोणतेही वर्कआउट करण्यासाठी डाएट करणे गरजेचे आहे. पण संशोधकर्त्यांच्या द्वारे जो रिसर्च करण्यात आला आहे त्यामध्ये असे म्हटले आहे की, ज्या लोकांनी व्यायाम करण्यापूर्वी उपाशी राहतात त्यांच्यामध्ये 20 टक्के चरबी कमी होते. म्हणजेच उपाशीपोटी व्यायाम करणे फायदेशीर आहे. यामुळे अधिक चरबी कमी करता येऊ शकते.

खासकरुन जेव्हा तु्म्ही सकाळी उठल्यानंतर व्यायाम करणार असाल तर तो एका तासापेक्षा अधिक वेळ करु नका. कारण शरीराला उर्जेचे गरज असते. ही उर्जा शरीरातील ग्लाइकोजेनपासून आपल्याला मिळते. हे ग्लायकोजन आपल्याला ग्लूकोज पासून भेटते. जे शरीरातील मासपेशी आणि लिव्हरमध्ये जमा असतात. जेव्हा एखादा वर्कआउट कराल तेव्हा त्यावेळी शरीराला उर्जेची गरज असते.

नॉर्थथंब्रिया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी वर्कआउट आणि खाण्यापिण्यामधील संबंध जाणून घेण्यासाठी एक रिसर्ज केला आहे. त्यामधून असे समोर आले आहे की, रात्री उपाशी पोटी राहणारे सकाळी वर्कआउट करत असतील तर ते दिवसभरात खुप खातात. या व्यतिरिक्त रिसर्चमध्ये हे सुद्धा समोर आले की, असे केल्यास एकूण किती फॅट बर्न होतात.(Night Shift मध्ये काम करतायत? 'या' पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी)

रिसर्च मधून असे समोर आले की, सर्व लोकांनी व्यायाम योग्य पद्धतीने केला. त्यांनी त्यासाठी शरीरातील उर्जेचा वापर केला. तसेच सकाळी व्यायाम ज्या लोकांनी केला त्यांनी सुद्धा कोणतीही अतिरिक्त उर्जा वापरली नाही. पण त्यांना भूक अधिक लागली. रिसर्च मधील महत्वपूर्ण निष्कर्ष असा होता की, ज्यांनी व्यायामापूर्वी काहीच खाल्ले नाही त्यांच्यामध्ये 20 टक्के अधिक फॅट बर्न झाले. म्हणजेच उपाशी पोटी व्यायाम करणे अधिक फायदेशीर आहे.