प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: Flickr)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus)  सर्वात मोठा फटका बसलेल्या इटली (Italy)  देशातील शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसवरील लस (COVID19 Vaccine)  बनवण्यात यश आल्याचा दावा केला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, टाकीस नावाच्या एका कंपनीने इटलीमध्ये कोरोना व्हायरस लसीचा शोध लावला आहे. काही दिवसांपूर्वी, संसर्गजन्य रोगांसाठी लस शोधण्याच्या प्रयत्नांतून रोमच्या लॅझारो स्पॅलॅझानी नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये चाचण्या घेण्यात आल्या होत्या या लसीचा संक्रमित उंदरांवर प्रयोग केला असता त्यांच्या पेशीत अँटिबॉडीज तयार झाल्याचे आढळून आले. त्यानंतर ही लस मानवी पेशींवर सुद्धा कार्य करू शकते का याचा अभ्यास शास्त्रज्ञही सुरु केला आहे. लवकर या लसीची मानवी शरीरावर चाचणी करण्यात येणार आहे. Coronavirus: केरळमधील कोरोना व्हायरस रुग्णांवर सुरु होणार Zingivir-H या आयुर्वेदिक औषधाची क्लिनिकल चाचणी; CTRI ने दिली मान्यता

टाकीसचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुईगी ऑरिसिचिओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमच कोणत्या लसीने मानवी पेशींमध्ये असलेल्या कोविड 19 विषाणूला घटवण्यात सकारात्मक परिणाम दाखवले आहेत.जगात कोविड 19 चा प्रसार सुरु झाल्यापासून लस शोधण्यासाठी सुरु असलेल्या संशोधनात हे मोठे यश आहे. ऑरिसिचिओ यांनी पुढे सांगितले की, "एकाच लसीकरणानंतर उंदरांच्या शरीरात अँटिबॉडीज विकसित झाल्या ज्यामुळे मानवी पेशींमध्ये कोरोना विषाणु असल्यास त्यांच्यावर त्वरित प्रभाव दिसून येऊ शकतो. उन्हाळा संपल्यानंतर मानवी शरीरावर सुद्धा ही कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे. Coronavirus: जगभरामध्ये COVID-19 संक्रमनामुळे 2,50,000 पेक्षाही अधिक नागरिकांचा मृत्यू- जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी

दरम्यान, इस्त्राईल या देशाच्या संरक्षण मंत्री नफ्ताली बेनेट यांनी सुद्धा आपल्या देशातील मुख्य जैविक संशोधन प्रयोगशाळेने कोरोनाच्या विषाणूचा नाश करू शकेल असे की अँटीबॉडीज तयार केले आहेत असा दावा केला आहे. सोमवारी एका निवेदनात, नफ्ताली बेनेट म्हणाल्या होत्या की,कोविड 19 या संसर्गाच्या संभाव्य उपचारांकरिता इस्त्राईल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्च (आयआयबीआर) ला मिळालेले महत्त्वपूर्ण यश आहे.