
सध्याच्या काळात सुंदर दिसणे हा केवळ स्त्रियांसाठी जिव्हाळ्याचा विषय राहिला नसून तो पुरुषांसाठीही तितकाचा महत्त्वाचा विषय बनला आहे. विवाहासाठी स्थळ शोधताना मुली बघताना मुलींच्या भरमसाठ अपेक्षा ऐकून थोड्या दिवसांनी ही पद्धत बदलून मुलांना बघण्याची पद्धत सुरु होईल असं म्हणायला हरकत नाही. त्यांना मुले सुंदर दिसणे हे जितके मुलींसाठी महत्त्वाचे असते तितकेच मुलांना आपल्याला मुलगी पटली पाहिजे यासाठी धडपड सुरु असते. पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक कामांमध्ये व्यस्त असलेल्या पुरुषांना स्वत:वर लक्ष द्यायला तितका वेळ मिळत नाही. बिझी लाइफ, जेवणाच्या वेळा, जागरण, टेन्शन्स याचा परिणाम त्याच्या चेह-यावर होतो.
पुरुषांना या सर्व गोष्टी कितीही दूर करण्याचा प्रयत्न केला तरी त्या काही दूर होत नाही. त्यामुळे सलून मध्ये वगैरे जाण्यास जर पुरुषांना वेळ नसेल तर घरच्या घरी या 4 उपायांनी ते आपला चेहरा तजेलदार ठेवू शकतात. जागतिक पुरुष दिनानिमित्त पाहा हे 4 घरगुती उपाय:
1. दही:
दही खाणे हे जितके शरीरासाठी जितके फायदेशीर असते तितकेच ते चेह-यासाठी फायदेशीर ठरतं. त्वचेसाठी दह्याचा वापर केल्याने त्वचा मुलायम होते. तसेच चेह-यावरील घाण दूर होण्यास मदत होते. चेहरा स्वच्छ करण्यासाठी एक चमचा दही घ्या आणि तुमच्या चेह-यावर हलक्या हातांनी लावा. 5 ते 10 मिनिटे तो लेप चेह-यावर तसाच ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा नीट धुवून घ्या.
2. कोरफड:
त्वचेसाठी आणि अनेक आजारांवर गुणकारी ठरणारे कोरफड ही वनस्पती चेह-यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये आढळून येणारे अॅंटीऑक्साइ़ड चेह-याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. कोरफडीचा वापर केल्याने चेह-याची त्वचा मुलायम होते आणि कोरफडीतून चेह-याला पोषकतत्वे मिळतात. कोरफडीचा गर चेह-यावर लावून तो काही वेळ तसाच ठेवा. नंतर काही वेळाने स्वच्छ थंड पाण्याने चेहरा धुवून काढा.
3. कच्चं दूध:
कच्चं दूध हे पिण्यासाठी जरी योग्य नसले तरीही ते चेह-यासाठी खूप गुणकारी आहे. दूधामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम यांसारखी अनेक पोषक तत्वे असतात. जी त्वचेचा रंग उजळवण्यासाठी मदत करतात. चेह-यावर कापसाच्या मदतीने कच्च दूध लावा आणि ते सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. चेहरा पहिल्यापेक्षा जास्त तकतकीत आणि तजेलदार होईल.
4. गुलाब पाणी:
गुलाबपाणी चेह-यावर लावल्यास आपल्या त्वचेवर धूळ, प्रदूषणामुळे आलेली उष्णता बाहेर पडून थंडावा मिळतो. पुरुषांनी रात्री झोपण्यापूर्वी चेह-यावर गुलाबपाणी चेह-याचा छान मसाज करा आणि मग तसेच शांत झोपी झा. सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने हा चेहरा धुवून टाका. चेह-यावर छान ग्लो येईल.
या झटपट घरगुती उपायांनी पुरुषांना आपल्या चेह-याला छान, तजेलदार आणि टवटवीत ठेवता येईल. आपल्या बिझी शेड्यूलमधून काही वेळ काढून हे उपाय करायला काही हरकत नाही.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)