Easy Yoga Poses For Beginners Video (Photo Credits: Youtube Screengrab)

Easy Yoga Poses For All Ages: मानसिक ताणतणाव आणि शारीरिक कमजोरी या दोन्ही समस्या अगदी ठळक मांडणाऱ्या घटना अलीकडे रोज आपल्यासमोर घडत आहेत. या समस्यांवर अत्यंत सोप्पे आणि परिणामकारक उत्तर म्हणजे योग. भारताच्या संस्कृतीचा अगदी जगभर पोहचलेला योग अभ्यास हा मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. केवळ आम्ही तुम्ही नव्हे तर जगभरातील दिग्गज तज्ञांनी सुद्धा हे सत्य मान्य केले आहे. याच योगाचा प्रसार व्हावा आणि प्रत्येक घरात ही संस्कृती पोहचावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  सरकारच्या पुढाकाराने 21 जून 2015 पासून आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Day of Yoga) साजरा करण्याची सुरुवात झाली. उद्या हा दिवस तुम्ही तुमच्या घरातील मंडळींसोबत काही योगासने करून साजरा करू शकता. घरातील प्रत्येक वयाच्या व्यक्तीला करता येतील अशी काही सोप्पी योगासने आणि ते करण्याची योग्य पद्धत खालील व्हिडीओज मधून जाणून घ्या.

तत्पूर्वी, योगासन करण्याची सुरुवात सूर्य नमस्कार घालून करावी असे नेहमी सुचवले जाते. शरीराला फार व्यायामाची सवय नसल्यास सूर्यनमस्कार हा एक चांगला वॉर्म अप ठरू शकतो. त्यामुळे सुरुवातीला सूर्यासनाची कृती पाहुयात.. Happy International Yoga Day 2020 Messages: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा Greetings, Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन करा आरोग्यदायी सुरुवात!

सूर्य नमस्कार

सूर्य नमस्कारच्या नंतर खाली दिलेली ही योगासने तुम्ही करून पहा. लक्षात ठेवा कुठलेली योगासन करताना शरीरावर क्षमतेपेक्षा अधिक जोर देऊ नका.

वृक्षासन

भुजंगासन

ताडासन

वज्रासन

सर्वांगासन

त्रिकोणासन

उद्याचा दिवस म्हणजेच 21 जून हा सगळ्यात मोठा दिवस आहे. या दिवशी वर्षभरात सूर्य पहाटे सर्वात लवकर उगवतो तर संध्याकाळी उशिरा सुर्यास्त असतो. त्यामुळे या दिवसाचं औचित्य राखून जगभरात 'निरोगी आरोग्या'साठी योग दिन साजरा केला जातो. दरवर्षी या निमित्ताने अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते मात्र यंदा कोरून संकटात लॉक डाऊन असल्याने मोदींनी सुद्धा सर्वांना घरी राहून योग करण्याचे आवाहन केलेले आहे.