
Happy Yoga Day Marathi Messages: योग हे केवळ एक शास्त्र नसून रोगाला स्वत: पासून दूर ठेवण्याचे एक अस्त्र आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत योग दिन साजरा करण्याबाबत एक प्रस्ताव मांडला. 2015 साली तो मान्य करण्यात आला. त्यानुसार, 21 जून 2015 पासून दरवर्षी नियमितपणे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येतो. उत्तर गोलार्धामध्ये असणार्या भागात 21 जून हा दिवस सगळ्यात मोठा दिवस आहे. या दिवशी वर्षभरात सूर्य पहाटे सर्वात लवकर उगवतो तर संध्याकाळी उशिरा सुर्यास्त असतो. त्यामुळे ही जगभरात योगा दिन साजरा केला जातो. या दिवसाची चैतन्यमय अशी सुरुवात व्हावी म्हणून तुम्ही तुमच्या नातलगांना तसेच मित्रपरिवाराला शुभेच्छा देण्यासाठी संदेश पाठवाल.
यासाठी तुम्ही इंटरनेटवर योगा दिनाचे शुभेच्छा संदेश शोधाल, अशा वेळी तुम्हाला मराठीतून जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देता याव्यात यासाठी खास शुभेच्छा संदेश:
योगा हे एक शस्त्र आहे
शरीर निरोगी आणि प्रसन्न ठेवण्याचे
गुणकारी अस्त्र आहे
जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

नियमितपणे योगा करण्यावर द्या भर
जे तुमचे शरीर सुदृढ ठेवण्यास मदत करेल आयुष्यभर
जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

निरोगी शरीर हेच आहे तुमच्या व्यक्तिमत्वाचे खरे गमक
नियमित योगसाधनेमुळे ज्यावर येईल खरी चमक
जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

निरोगी शरीर आणि मन:शांति मिळविण्याचा करा निर्धार
नियमितपणे योगसाधना करणे हाच आहे एकमेव आधार!
जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हेदेखील वाचा- International Yoga Day 2019: हृदयासाठी खूपच फायदेशीर आहेत ही 5 योगासने, नक्की करुन पाहा (Watch Video)
सुदृढ आरोग्य उपभोगा
जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मागील 5 वर्षांपासून 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं महत्त्व आता जगाच्या कानाकोपर्यापर्यंत पोहचलं आहे. याची जाणीव प्रत्येकाला करुन देण्यासाठी जागतिक योग दिनाचे हे शुभेच्छा संदेश नक्कीच कामी येतील.