How To Use Self-Testing COVID Kit CoviSelf: सध्या देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग वाढला आहे. मात्र या कठीण काळात आता पूर्वीप्रमाणे कोरोना टेस्ट (Corona Test) करण्यासाठी लॅबमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी कोरोना चाचणी करु शकता. यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (Indian Council of Medical Research) 'कोविसेल्फ' किटला मंजूरी दिली आहे. या किटद्वारे नागरिक आता घरच्या घरी केवळ 250 रुपयांत कोविड टेस्ट करु शकतात. यासाठी आयसीएमआरने (ICMR) अॅडव्हायजरी जारी केल्या आहेत. यात विनाकारण टेस्ट न करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. (नागरिक आता घरीच करू शकतात कोरोना चाचणी; 250 रुपयांच्या किटमध्ये 15 मिनिटांत जाणून घेता येणार रिझल्ट)
'कोविसेल्फ' किटद्वारे कोण करु शकतं कोविड टेस्ट?
कोरोनाचे लक्षण दिसत असलेले आणि कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले लोकच रैपिड एंटीजन टेस्ट 'कोविसेल्फ' किटद्वारे करु शकतात. दरम्यान, या किटच्या विक्रीसाठी DCGI ने मंजूरी दिली असून बाजारात उपलब्ध होण्यासाठी काही अवधी लागू शकतो.
ICMR Tweet:
𝐈𝐂𝐌𝐑 𝐢𝐬𝐬𝐮𝐞𝐝 𝐀𝐝𝐯𝐢𝐬𝐨𝐫𝐲 𝐟𝐨𝐫 𝐂𝐎𝐕𝐈𝐃-𝟏𝟗 𝐇𝐨𝐦𝐞 𝐓𝐞𝐬𝐭𝐢𝐧𝐠 𝐮𝐬𝐢𝐧𝐠 𝐑𝐚𝐩𝐢𝐝 𝐀𝐧𝐭𝐢𝐠𝐞𝐧 𝐓𝐞𝐬𝐭𝐬 (𝐑𝐀𝐓𝐬). For more details visit https://t.co/dI1pqvXAsZ @PMOIndia #ICMRFIGHTSCOVID19 #IndiaFightsCOVID19 pic.twitter.com/membV3hPbX
— ICMR (@ICMRDELHI) May 19, 2021
कोविड टेस्ट करण्यासाठी 'कोविसेल्फ' किटचा वापर कसा कराल?
# सर्वप्रथम मोबाईलमध्ये मायलॅब अॅप डाऊनलोड करा.
# या अॅपमध्ये तुम्हाला टेस्टिंग प्रक्रीया कळेल आणि टेस्टचा रिपोर्टही समजेल.
# विशेष म्हणजे या रैपिड एंटीजन टेस्टमध्ये केवळ नोजल स्वॅबची गरज असेल.
# टेस्टिंग प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर टेस्टिंग स्ट्रिपचा फोटो काढा. या फोटोचा वापर अॅपवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी होईल.
# टेस्टिंग रिपोर्ट समजण्यासाठी 15 मिनिटे वाट पाहावी लागेल.
#टेस्ट किटमध्ये दोन भाग असतील- 1. कंट्रोल सेक्शन 2. टेस्ट सेक्शन
# जर तुमचा बार कंट्रोल सेक्शनवर (C) वर असेल तर तुमचा रिपोर्ट निगेटीव्ह आहे. पण जर बार टेस्ट सेक्शन आणि कंट्रोल सेक्शन दोघांवर (T) असेल तर तुमची टेस्ट पॉझिटीव्ह आहे.
विशेष म्हणजे या किटद्वारे टेस्ट केल्यानंतर पॉझिटीव्ह रिपोर्ट्स आल्यास पुन्हा टेस्ट करण्याची आवश्यकता नसल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. मात्र निगेटीव्ह रिपोर्ट येऊनही कोरोना लक्षणे दिसत असल्यास तातडीने आरटीपीसीआर टेस्ट करणे आवश्यक आहे.